अतिक्रमण समस्या बाबतीत अमरण उपोषण सुरुच

34

🔹उपोषणाचा तिसरा दिवस ; प्रशासनाला गांभीर्य नाही

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

सिरसाळा(दि.16सप्टेंबर):-ग्रामपंचायत चे ग्रामसेवक शेख अब्दुला यांची तात्काळ बदली प्रशासनाने केली आहे. पंरतु गट नंबर ३४३ मधील रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण अद्याप हटवले नाही व त्याबाबत संबंधित प्रशासनाने अद्याप काहीही कार्यवाही केली नसल्याने सिरसाळा ग्रामस्थांचे सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाया समोर अमरण उपोषण सुरुच आहे. अमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.पंरतु अद्याप प्रशासनाला याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही
रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मागणी गेल्या एक वर्षा पासुन होती/ आहे.

ह्या अतिक्रमणा बाबत ग्रामसेवक शेख अब्दुला यांनी दुटप्पी व संशयास्पद भूमीका घेतली म्हणन संबंधित अतिक्रमण हटवण्याच्या मागणी बरोबर ग्रामसेवक शेख अब्दुला यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ धर्मा मेंडके, मिलिंद चोपडे, केशव बन्सोडे व अन्य ग्रामस्थ यांनी करुन सिरसाळा ग्रामपंचायत कार्यालाया समोर अमरण उपोषण दिनांक १४ सप्टेंबर सोमवार पासुन सुरु केले.

दोन मागण्या पैकी एक असलेली मागणी म्हणजे ग्रामसेवकाची बदली तर हि बदली होऊन त्यांच्या जागी सिरसाळा ग्रामपंचायतला नवीन ग्रामसेवक श्री. नागरगोजे नियुक्त केले आहेत. तशी माहिती देखील परळी पंचायत समिती चे कर्मचारी यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषण कर्त्यांना दिली. पंरतु रेणूका माता मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न संबंधित प्रशासनाने मार्गी लावला नाही अथवा यावर काही कार्यवाही केली नसल्या मुळे ग्रामस्थांचे उपोषण सुरुच आहे.