🔺वेळीच प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.16सप्टेंबर):-तालुक्याची जीवन वाहिनी येरळा(वेदावती) नदीवरील ब्रिटिश कालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या संडव्याची भितींवरील रानवेली आणि झुडपामुळे भित कमजोर होत असून वेळीच लक्ष न दिल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो.

खटाव तालुक्यातील उत्तरेला असलेला ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून हा तलाव राणी विक्टोरिया च्या काळात या तलावाचे बांधकाम झाले होते. 11.87द. ल. घ. मि 416.40 द. ल. घं.फु 650 हेक्टर क्षेत्रात हा तलाव आहे.
खरिपाला योग्य पाऊस पडल्याने सुगी जोरात सुरू झाली आहे, तर बहुतांश शेतकर्यांचे ,सोयाबीन,घेवडा, मुग, बटाटा, मटकी,चवळी, ही नगदी पिके शेतातच असून पाऊस मोठा झाला नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला, आणि आता रब्बी पिकाची काळजी मिटली असली तरी संडव्यावरील भिंतीवरील झाडे मात्र धोक्याची सूचना देत असून प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED