ऑक्सिमिटर थर्मामीटरच्या नावाखाली मनपाकडून नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास दिल्याबद्दल मनसेचे आयुक्तांना निवेदन

15

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.16सप्टेंबर):-मागील काही दिवसांपासून मनपा पथकातील कर्मचारी नागरिकांना थर्मामीटर ऑक्सिमिटर तपासणीच्या नावाखाली नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याबाबत मनसेने आवाज उठवला असून आज जिल्हा अध्यक्ष श्री. सुहासजी दाशरथे व शहर अध्यक्ष श्री. सतनामसिंगजी गुलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी मनपा उपायुक्तांकडे निवेदन दिले असून कोरोना विषयी काही सूचनाही मनसे कडून करण्यात आल्या आहेत.

यावेळी संतोष कुटे, दिपक पवार, गणेश साळुंके, अविनाश पोफळे, चंदू नवपुते, राहुल कुबेर, युवराज गवई, बाबुराव जाधव, रामकृष्ण मोरे, शशिकांत पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.