✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.17सप्टेंबर):-निजामाच्या जुलमी राजवतीविरुद्ध संघर्ष करीत तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस कारवाईच्या पोलादी निर्णयाने आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या लोकलढ्यामुळे अखेर दिनांक १७ सप्टेंबर १९४८ ला म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना व दोन दिवसानंतर स्वातंत्र्य मिळाले. तेव्हाचे आंध्र,कर्नाटकातील काही जिल्हे,मराठवाडा व त्यातील असलेला तेव्हाचा राजुरा व आताचे राजुरा, कोरपना व जिवती तालुके यांचा त्यात समावेश होता.

या मुक्तीसंग्रामाचा उत्सव महाराष्ट्रातील मराठवाडयात साजरा होत होता, परंतु साठ वर्षांपासून राजुरा क्षेत् मात्रर या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाच्या उत्सवापासून दूर होते. सन १९९० मध्ये ऍड. वामनराव चटप हे कुशाग्र बुद्धीचे लोकनेते निवडून आल्यानंतर त्यांच्या अथक प्रयत्नाने दिनांक १७ सप्टेंबर २००६ पासून राजुरा येथील लोकांना स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचा साजरा करण्याची संधी मिळाली, हे माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांचे कर्तृत्व सदोदित जनतेच्या स्मरणात राहील.

ऍड.वामनराव चटप यांनी विधानसभेत राजुरा भागात मुक्तीसंग्राम दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि स्वातंत्र दिनाप्रमाणेच सर्व कार्यालयात ध्वजारोहण करण्यात यावे, अशी मागणी सतत लावून धरली. परंतु हा छोटासा भाग चंद्रपूर जिल्ह्यात येत असल्याने ही सुट्टी मंजूर करण्यास काही तांत्रिक अडचणी होत्या. परंतु उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित ऍड. वामनराव चटप यांनी विधानसभेत विविध संसदीय आयुधे वापरीत हा प्रश्न विधानसभेत एकट्याने किल्ला लढविला.अखेर ऍड. वामनराव चटप सरकारला आपला मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झाले आणि दिनांक १६ सप्टेंबर २००६ ला दुपारी ध्वजारोहन करण्याचा आदेश राजुरा उपविभागीय कार्यालयात आला. यामुळे राजुरा भागात एकच जल्लोष झाला. सजग लोकप्रतिनिधी असला की काय होऊ शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

म्हणून राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील लोक ऍड. वामनराव चटप यांना कधीच विसरू शकत नाही.
राजुरा भागात मुक्तीसंग्रामाच्या उत्सवाची परंपरा आता चांगलीच रुजली आहे. मुक्तीसंग्रामच्या लढ्यात ज्यांचे योगदान आहे, अशा सर्व मुक्तीसंग्राम सैनिक, योद्धे व हा उत्सव एक परंपरा बनविली, अशा सर्व महानुभाव यांना मानाचा मुजरा…

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED