भामरागड तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये घोटाळा

    41

    ✒️संतोष संगीडवार(विशेष प्रतिनिधी)मो:-7972265275

    भामरागड(दि.18सप्टेंबर):- तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये कोठी,लाहेरी,मन्नेराजाराम,आरेवाडा,मेडपल्ली, मीरगुडवाचा,मल्लपोद्दुर,धोडराज,येथील ग्रामपंचायत येथे कोणतेही ग्रामपंचायत सदस्य व संरपच यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत चे मुंद्रांक शुल्क 2/करायची तेरावा वीत्त आयोग नीधी/चौधावावीत्त आयोग/पैसा नीधी/तेरा ताळेबंद नीधी/शासनाची दिशाभूल करुण काही ग्रामसेवक यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना नकडविता लाखो रुपयांची भ्रष्टाचार केलेली आहे.

    संबंधित ग्रामसेवक यांची योग्य चौकशी व निलंबीत करण्यात यावी अशी शिवसेनेची मागणी आदरणीय ना. एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनीक बांधकाम मंत्री यांना निवेदन शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाचे उपजिल्हा प्रमुख रिवाज शेख तसेच अहेरी विधानसभा प्रमुख अरुण धुर्वे तसेच भामरागड तालुका प्रमुख खुशाल मडावी अहेरी विधानसभेचे शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख बिरजु गेडाम अहेरी तालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे शिवसेना नेते सुभाष घुटे दिलीप सुरपाम आणी भामरागड तालुक्यातील सर्व शिवसैनिक यांनी निवेदन दिले.