धाराशिव साखर कारखाना युनिट१ लि. चोराखळी उस्मानाबाद सन२०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ

  39

  ✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.18सप्टेंबर):-चोराखळीचे मा. सरपंच, कारखान्याचे सभासद श्री.खंडेराव मैदांड यांच्या सुविद्य पत्नी सौ.अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन पुजा संपन्न झाली.

  याशुभप्रसंगी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हाईस चेअरमन विश्वासआप्पा शिंदे, मनसेचे सहकार सेनेचे शाॅडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, अनंत आखाडे दाजी, डाॅ. जोगदंड, मनसेचे शशिकांत पाटील, सोमनाथ राऊत, रविराजे देशमुख, अभिजीत हुबे, सरपंच बाबा साठे यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ करण्यात आला.
  कोरोनाच्या काळात सोशल डिस्टिंगशन ठेवून कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुर्ण केली. कारखान्याची सगळी कामे अंतिम टप्यात असून गळपासाठी कारखाना सज्ज होऊन चार लाख उच्चांक गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात आली. पुढील काळात ज्युस ते इथेनॉल प्रक्रिया लवकरच चालू करणार असून असावणी प्रकल्प हा पुढील काही महिन्यात सुरू होत आहे.

  कोरोनाच्या काळात शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला असून यंदा पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. बहुतांश नद्या, तलाव, बंधारे भरले आहेत.पाऊसकाळाने चांगली साथ दिली आहे. शेतकऱ्याची पिकं, ऊस चांगल्याप्रकारे आली असून त्यामुळे ऊस टनेजमध्ये वाढ आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत कारखानावर ठेवलेल्या विश्वासाला जागत ऊस देऊन सहकार्य करावे.

  यावेळी कारखान्याचे संचालक रणजित भोसले, दिपक आदमिले, विकास काळे,रामभाऊ रांखुडे, चिफ इंजिनिअर कोळगे, चिफ केमिस्ट तांबारे, शेती अधिकारी गव्हाणे, लोमटे, मोरे, कोकाटे, डूबल, जमाले, आदी कर्मचारी उपस्थित होते.