
🔺नुकसानग्रस्त भागात वामनराव चटप यांची प्रत्यक्ष पाहणी
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४
कोरपना(दि.19सप्टेंबर):-तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याच्या शेतातील कापूस,तूर,सोयाबीन भुईसपाट झाले. त्याचे तातडीने पंचनामे करून प्रति हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार अड वामनराव चटप यांनी केली.
तालुक्यातील कोरपना , कातलाबोडी, कुकुडबोडी, बोरगाव, केरामबोडी, गणेशमोड, हेटी, शेरज बू , कोडशी, धोपटाळा आदी शेतशिवारातील शेकडो हेक्टरवरील हाती आलेले कापूस ,तूर व कापणीवर आलेले सोयाबीन पूर्णत वादळी वाऱ्याच्या तडाख्यात जमीन दोस्त झाली.
परिणामी, शेतकरी चांगलाच अडचनीत आला आहे. यात उत्पादनात तूट व आर्थिक विवंचना या दोन्ही बाबींचा त्याला फटका बसणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या पूर्वी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण नवले, रमाकात मालेकर, बंडू राजूरकर, अविनाश मुसळे, पद्माकर मोहितकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————-
कोरोना काळात देखील माजी आमदार वामनराव चटप हे सतत सक्रिय असून मतदारासंघातील पूरग्रस्त कुलथा येथे देखील त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली होती. आता, कोरपना तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात देखील त्यांनी पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी आभार मानले.