आदिवासी दुर्गम भागात मोबाईल रुग्णवाहीका उपलब्ध करूण द्या

    55

    ?राष्ट्रवादी पक्षाचे नेते सय्यद आबीद अली यांनी केली मागणी

    ✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

    कोरपना(दि.20सप्टेंबर):-चंद्रपूर जील्ह्याच्या टोकेवर असलेल्या आदिवासी अतिदुर्गम नक्षलभागात आवश्यक गरजे नुसार आरोग्य सेवा लोकांचा दारात पोहचलेली नाही अनेक गुडे पाडे विकासा पासून कोसो दुर आहेत दळणवळण व्यवस्था व वाहन सुविधा नसल्या ने अनेक वेळा उपचारा अभावी रुग्णांना जिव गमवावे लागले आहे. ग्रामीण रुग्णालय व शासनाचे १०८ अॅम्बुलंस वेळेवर उपलब्ध होत नाही अश्यापारिस्थीत रूग्ण व कुंटूबाना वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही.

    हे वास्तव्य असताना १०८ वाहन कोविड १९सेवेत असल्या ने आरोग्य सेवा डळमळीत झाले आहे आदीवासी भागात सघ्या डेंगु, मलेरियाने,चिकनगुन्या,ताईफाइड रोगाने थैमान घातले असुन गावा गावात रुग्णाची वाढती सख्या व कोरोना ग्रामीण भागात पसरत असल्या ने नागरीकाच्या चितां वाढवित असताना अनेक अपघात व गंभीर आजारी रुग्णाना रुग्णवाहीका उपलब्ध होत नसल्याने गैरसोयी व वेळीच उपचार होत नसल्या ने आदीवासी दुर्गम भागात जलद गतिने आरोग्य सुविधा उपलब्ध करुण देण्यासाठी कोरपना तालुक्यातील रूपापेठ व जिवती तालुक्यातील वणी (बु) ग्राम पंचायतीना खनिज विकास निधितुन आयुष्यमान आरोग्य उपकेन्द्रात मोबाईल रुग्णवाहीका उपलब्ध करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आबिद अली यांनी आरोग्य मंत्री ना राजेश टोपे व जिल्ह्याचे पालक मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांचेकडे केली आहे.