🔹जागतिक हृदय दिन (22 सप्टेंबर) – विशेष लेख

22 सप्टेंबर 2020 ला सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येत आहे. हृदय आपल्या शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आज-काल वॄद्ध तसेच तरुणांचाही हदय विकारांच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यू पैकी 32 टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे जागतिक हदय दिवस साजरा करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे फार आवश्यक आहे.

इतर कुणा पेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाखू ,धूम्रपान, आणि मद्यपानाचे व्यसन , अशा व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. त्याच बरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे, तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे या गोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.
हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलाहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन, आणि योग साधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखाद्या छंदात मन गुंतवून तणावापासून दूर रहावे.
हृदयरोग होण्यासाठी निश्चित असे वय नाही. तो कोणत्याही वयात होऊ शकतो.यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब ,कोलेस्ट्रॉल, आणि मधुमेहाची तपासणी होते, अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.
हृदयाच्या काळजीसाठी हे करायला हवे.:-
१) थोडा वेळ व्यायामासाठी काढावा.
२) दर दिवशी कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणे हृदयासाठी फायदेशीर आहे.
३) वेळेचा अभाव असेल तर आपण चालायला हवे.
४) प्रकृतीनुसार आहार घ्यावा.
५) मिठाचे कमी प्रमाणात सेवन करा.
६) ताजी फळे आणि भाजीपाला खावेत.
७) नाश्ता आणि जेवण वेळेवर करा.
८) तंबाखू पासून लांब रहा.
९)कित्येक तास एका स्थितीत बसणे हृदयासाठी अपायकारक ठरू शकते.
१०) आयुष्यात येणारा ताण पण आम्हाला चार हात लांब ठेवा.
शरीर स्वस्थ असेल तर हृदय देखील स्वस्थ
राहते. दर महिन्याला खाण्याचे तेल देखील बदलायला पाहिजे.
होमोसिस्टीन एक अॅमिनो ऍसिड आहे, प्रथिनांच्या पचना नंतर ही शिल्लक राहतो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून हृदयरोगाचा धोका वाढत असते, हे नियंत्रणात ठेवण्यासाठी विटामिन बी व फोलिक अॅसिड, आणि व्हिटॅमिन सी घ्यायला हवे.
म्हणून हृदय स्वस्थ राहण्यासाठी योग्य ती काळजी व आहार घेतला पाहिजे.

✒️लेखिका:-सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर,गोंदिया.
मो:-8007664039

गोंदिया, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED