✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.21सप्टेंबर):- सोमवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे साहेब यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले धर्मांतरीत बौद्धांची पूर्वीची जात लक्षात घेऊन त्यांनी महार अशी नोंद जरी केली व धर्मांतरीत बौध्द असे जरी सांगितले तरी त्यांची अनुसूचित जातीमध्ये नोंद करावी अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी मागणीचे निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील शासकीये जमिनी अनुसूचित जातीच्या बेरोजगारांना कसन्याकरिता देण्यात याव्यात मौजे जानफळ, मौजे फरकांडे तालुका एरंडोल जिल्हा जळगांव येथील अतिक्रमण नियमित करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह निवेदन देण्यात आले या प्रसंगी रि.पा.ई(आठवले) उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोदजी बागुल, जिल्हा जळगाव तालुका एरंडोल तालुका प्रमुख प्रविणजी बाविस्कर,तालुका सरचिटणीस गजानन पाटील, युवा नेते प्रशांतभाऊ गांगुर्डे, राजेंद्र भिल्ल, आत्माराम भिल्ल, रविंद्र भिल्ल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED