दिव्यांग वृध्द निराधार यांच्या झोपा काढो आंदोलनाच्या निवेदनाची नायगाव तहसिलदार यांनी घेतली दखल

  42

  🔹 तिन प्रश्नांची तात्काळ केली अंमलबजावणी

  🔸झोपा काढो आंदोलन मागे – चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

  नांदेड(दि.3ऑक्टोबर):-दिव्यांग,वृध्द,निराधार यांच्या पाच प्रमुख मागण्या मा. तहसिलदार साहेब नायगाव यांनी पंधरा दिवसांत न सोडविले तर त्यांच्या दालनात झोपा काढो आंदोलन दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा इशारा नायगाव तालुक्यातील शिष्टमंडाळानी निवेदनाद्वारे दिला असता कर्तव्यदक्ष नायगाव तहसिलदार सुरेखानांदे मॅडमनी पाच मांगन्याचे लेखी उतर देऊन झोपा काढो आंदोलन स्थगित करून प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केल्यामुळे नायगाव येथील झोपा काढो आंदोलन स्थगित करण्यात आले.

  केलेल्या मागन्या मिळालेले उतर खालील प्रमाणे
  1) दिव्यांग वृध्द निराधार यांना केंद्र सरकारने दरमहा मिळणारे अनुदान तिन महिने दुप्पट एकरकमी खात्यात देण्याचे आदेश देऊन ते तर मिळालेच नाहि पण नेहमी मिळणारे अनुदान चार महिन्या पासून मिळत नाहि.
  मिळालेले उतर जुलै ते आँगस्ट तिन महिन्याचे तिन दिवसात जमा करण्यात येईल.

  २) जागतिक संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना अंत्योदय योजनेत समाविष्टकरून त्यांना लाभ देण्याचे लेखि आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी का? केली जात नाहि ?
  मिळालेले उतर अंत्योदय योजनेत नायगाव तालुक्यात 4344 कार्याचे दिलेले इंष्टांक मंजुर केलेले आहे.शासनाकडुन वाढिव इंष्टांक दिलेला नाही वाढीव मंजुरी आल्यानंतर दिव्यांगाना अंत्योदय योजनेत लाभ दिला जाईल.

  ३) अशा संकटकाळी भुकमारी होऊ नये म्हणून धान्य किट पुरवठा करण्याचे आदेश देऊन सुध्दा अंमलबजावणी केली जात नाहि
  दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या विनंती वरुन नायगाव तालुक्यातील दिव्यांगाना दोनशे पाच धान्य किट देण्यात आले.
  ४) संजय गांधी, ईतर योजनेत पाञ लाभार्थी निवड आठ ते दहा महिने होत नाहि निवड झालेल्या पाञ लाभार्थ्यांना मंजुरीनंतर सहा महिने अनुदान मिळत नाहि व नामंजूर किव्वा मंजुर झालेले कळविण्यात येत नाही.

  मिळालेले उतर संजय गांधी निराधार कमिटी अस्तित्वात नाही मा.जिल्हाअधिकारी साहेब यांच्याआदेशाननुसार दरमहा मिटिंग मध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात येतात खात्यात जमा केले जाते.
  ५) संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीत दिव्यांग बांधवांना सदस्य यांची निवड शासन आदेश असुन त्यांची अंमलबजावणी केली जात नाहि .
  मिळालेले उतर संजय गांधी निराधार कमिटी अस्तित्वात नसुन कमिटीत पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मा जिल्हाधिकारी साहेब निवड केली जाते.
  तरी आपल्या निवेदनानुसार वेळोवेळी नायगाव तहसिल कार्यालयाकडून दिव्यांग बांधवांचे कामे केली जात आहेत .तरी काही कामे प्रलंबित असतील तर निर्देशनास आणुन द्यावी त्वरीत निर्णय घेतला जाईल .
  तरी आपले झोपा काढत आंदोलन स्थगित करून प्रशासन यास सहकार्य करावे.

  अशाप्रकारे लेखि पञ दिल्यामुळे अनुदान खात्यात जमा केल्यामुळे नायगाव तहसिल दारातील झोपा काढो आंदोलन स्थगित करण्यात आले असे प्रसिद्ध पञक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बेलरकर सचिव माधव शिंदे. शंकर शिंदे. शंकर पांचाळ, गायकवाड,देगावकर. शिष्टमंडळ इत्यादी ने निवेदनाद्वारे दिला