माझी व माझ्या हॉस्पिटलची बदनामी करण्याचे कारस्थान – डॉ. खिजेंद्र गेडाम

38

🔹तपासणी पथकाला व कर्मचाऱ्यांना डॉ. गेडाम यांनी केले सहकार्य – विलास विखार यांचे मत

🔸प्रसारमाध्यमामध्ये गाजत असलेले प्रकरण

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.5ऑक्टोबर):- 1ऑक्टोबरचे रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान डॉ. खिजेंद्र गेडाम यांच्या हॉस्पिटलच्या व त्यांच्या कार्याची तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकासोबत मी (डॉ. खिजेंद्र गेडाम) कोणतीही अरेरावी केली नसताना, दत्तात्रय दलाल नावाच्या वार्ताहरांने मला ( डॉ. खिजेंद्र गेडाम) व माझ्या हॉस्पिटलला बदनाम करण्यासाठी
एका मराठी वृत्तपत्रात पूर्व ग्रहदुषित चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त प्रकाशित केले. एवढ्यावरच त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने एका न्यूज पोर्टल वर व्हिडिओ व्हायरल केला. हे मला( डॉ. खिजेंद्र गेडाम) बदनाम करण्याचे कारस्थान असून अश्या वार्ताहरापासून जनतेने सावध राहण्याचे आव्हान ब्रम्हपुरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. खिजेंद्र गेडाम यांनी केले आहे.

दिनांक 1 ऑक्टोबर च्या रात्री 9.30 वाजता नगर परिषदेचे बांधकाम सभापती विलास विखार यांच्या नेतृत्वात माझ्या ( डॉ. खिजेंद्र गेडाम ) हॉस्पिटल मध्ये तपासणी पथक आले. त्यांच्या सोबत 20 ते 25 जण होते. या पथकाला माझ्या हॉस्पिटलची तपासणी करण्याबाबतचे मला ( डॉ. खिजेंद्र गेडाम ) पत्र दाखवा व तपासणी करा, असे म्हणालो . यात कश्याची अरेरावी आहे? माझ्या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे आलेल्या रुग्णाची तपासणी करणे सुरूच आहे, असेही डॉ. खिजेंद्र गेडाम यांनी म्हटले आहे.

तसेच तपासणी पथकातील विलास विखार ( सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती,नगर परिषद, ब्रम्हपुरी) यांनी स्पष्ट सांगितल की, डॉ. खिजेंद्र गेडाम यांनी आमच्या सोबत कुठलीही अरेरावी केली नाही. आम्हाला सहकार्याच केले.प्रसारमाध्यमातून कुणाचीही बदनामी करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमनीं वस्तुस्थिती प्रकाशित करावी अशी अपेक्षा जनतेला असते,याबाबत काही मान्यवर व बुद्धिजीवी वर्ग तात्विक चर्चा करीत आहेत.