सारडगाव येथील लिंबु उत्पादक शेतकरी एक वर्षांपासुन अनुदानापासुन वंचित

35

🔸कृषी विभागाचे दुर्लक्ष

🔹200 शेतकर्यांचे कृषी कार्यालयापुढे उपोषण

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.6ऑक्टोबर):- परळी तालुक्यातील सारडगाव येथील 280 लिंबु उत्पादक शेतकर्यांना गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अनुदान देण्यास एक वर्षानंतरही टाळाटाळ होत असल्याने दोनशे शेतकर्यांनी परळी तालुका कृषी कार्यालयापुढे आज सोमवार दि.5 रोजी अमरण उपोषण करत तालुका कृषी अधिकार्यास घेराव घातला.प्रतिहेक्टरी अठरा हजार रुपयांचे अनुदान देण्यासंदर्भात तहसिलदार यांना कळविल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

तालुक्यातील सारडगाव येथे लिंबाचे मोठे उत्पादन घेतले जाते या एकाच गावात 160 हेक्टरवर लिंबाच्या फळबागा आहेत.गतवर्षी सन 2019 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावातील फळबागा उध्वस्त झाल्या होत्या शासनाने कोरडवाहु व बागायती पिकांना अतिवृष्टीची मदत जाहिर करुनही सारडगाव येथील 280 लिंबु उत्पादक या अनुदानापासुन वंचितच आहेत.कृषी कार्यालयाकडुन अनुदान मंजुरीसाठी पंचनामे व इतर माहिती तहसिल कार्यालयास न दिल्याने व अनुदान मिळावे म्हणुन वेळोवेळी निवेदन देवुनही दखल घेतली नसल्याने सारडगाव येथील दोनशे शेतकरी तालुका कृषी कार्यालयापुढे अमरण उपोषणास बसले.

तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे हे कार्यालयाकडे येताच त्यांना घेराव घालुन उपोषणस्थळी बसवत जाब विचारला गेला.परंतु या अनुदानाबाबत त्यांनी कुठलीच कार्यालयीन पुर्तता केली नसल्याचे समोर आले यामुळे शेतकरी आक्रमक झाले व शेवटी दुपारी तीन वाजता तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी सारडगाव येथील 140 पेक्षा अधिक हेक्टरवरील शेतकर्यांच्या लिंबाच्या बागांचे नुकसान झाले असुन प्रतिहेक्टरी 18000 रु.याप्रमाणे 25 लाख 20 हजार रु.अनुदान मंजुर करावे अशी शिफारस तहसिल कार्यालयाकडे केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.