उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावे – दलित पँथर

    38

    ✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    बारामती(दि.7ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील हातरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून y+ श्रेणीतील पीडित कुटुंबाला सुरक्षा देऊन उत्तर प्रदेश मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा असे निवेदन तहसिलदार बारामती यांना दिले.

    दलित पँथर प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले , पश्चिम महाराष्ट्र् प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड,पुणे जिल्हा संघटक अमित बगाडे,बारामती तालुका महिला अध्यक्ष वंदना भोसले,बारामती तालुका अध्यक्ष गौरव अहिवळे,बारामती तालुका कार्यध्यक्ष शंतनू साळवे,बारामती तालुका सरचिटणीस शिवदास जगताप,शुभम गायकवाड बारामती शहर अध्यक्ष व रेश्मा कांबळे बारामती महिला अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.