दिव्यांग मित्र अॅप नांदेड चा उडाला बोजवारा

32

🔸नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तीत या अॅप विषयी तिव्र नाराजी

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.8ऑक्टोबर):-समाज कल्याण विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या दिव्यांगाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे दिव्यांगापर्यंत घरपोच पोहचविण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘दिव्यांग मित्र अप’ ची निर्मिती करुन या अपचे ऑनलाईन उद्घाटन हे अतिशय गाजत वाजत मोठ्या थाटात माटात अति उत्साहात जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.

त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अभिनव गोयल, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांनी दिव्यांगासाठी या अॅपची निर्मीती केली होती.

व तसेच या दिव्यांग मित्र ॲपमध्ये दिव्यांग व्यक्तींना आपली नोंदणी करुन विविध शासकिय योजनांची माहिती व सर्व सुविधा आणि मदतीची माहिती या अपवरुन दिव्यांगाला तात्काळ मिळणार होती. शासनाकडुन पाठविण्यात आलेल्या दिव्यांग विषयी वेळोवेळी सुचना अथवा संदेश या अप’द्वारे देणार होते. दिव्यांगानी या अप’द्वारे सोप्या पध्दतीने आपली नोंदणी करुन स्वत:चे नाव, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांकासह इतर माहिती भरुन ईतर कागदपत्रे अपलोड करण्यात आले. पुर्ण माहिती भरल्यानंतर समाजकल्याण अधिकारी व संबंधित अधिकारी सदर माहिती पडताळणी करुन अप्रु देणार होते.

पण गेल्या तिन ते चार महिन्यांपासुन एक ही दिव्यांग व्यक्तीला या अॅप व्दारे कोणत्याही शासकिय योजनांचा लाभ दिव्यांगाला मिळाला नाही. व तसेच दिव्यांगाच्या प्रोफाईला अप्रुल सुध्दा देण्यात आले नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला हि दिव्यांग अॅप म्हणजे *बोलाचा भात अनं बोलाची कडी* सारखी गत झाली आहे.काही दिव्यांग व्यक्तीने कोरोणा ( लाॅक डाऊनच्या) काळात या अॅपसाठी दिव्यांगानी स्मार्ट फोन सुध्दा खरेदी करुन नाहक अर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तीवर उपासमारीची वेळ आली आहे. पण त्या अॅपची जिल्हा आणि तालुका स्तरावर काटेकोर पणे अंमलबजावणी होत नसल्यानेमुळे आणि व तसेच या अॅप व्दारे कोणत्या योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या पदरी शेवटी निराशाच पडली आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीत या अॅप विषयी तिव्र नाराजी पसरली आहे. असे मत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केले आहे.

त्यांच्या सोबत त्यावेळी जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, फारुख कुरैशी, प्रियंका पांडुरंग राठोड, अहेमद भाई, फहीमोद्दीन सरवरी, रमेश गोडबोले, शेख इम्रान, केशव वाठोरे, अ.खलिल खान,धुरपत सुर्यवंशी, सलमा शेख, शब्बीर बेग, कुबिर राठोड,अ.गफुर, अंकुश कदम, दिपक सुर्यवंशी, सुलताना रतन कुरैशी, मारोती लांडगे, सुरज राठोड, आकाश सोनुले, कांचन वानखेडे यावेळी उपस्थित होते…