✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.8ऑक्टोबर):-ओबीसी समाजाला न्याय द्यावा ओबीसी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात यावी व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्यात यावे, ओबीसी सोबतच सर्व जातीचीं जातीनिहाय जनगणना करण्यात यावी केंद्राने न झाल्यास महाराष्ट्र सरकारने करावी, महाराष्ट्रात रखडलेली मेगा भरती लवकर सुरू करावी.

ओबीसींना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यात यावे,ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसींना ६,९,१२,१४, टक्के वर्ग तिन व चारच्या पदाकरिता आरक्षण आहे अशा जिल्ह्यात ओबीसींना १९ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदार नायगांव बाजार यांच्या मार्फत केले आहे.

५२ टक्के असलेल्या ओबिसी समाजास संविधानीक तरतुदी नुसार ज्या सोयी सवलती व सुविधा मिळावयास पाहीेजे त्या स्वातंत्र्यापासुन अजुनपर्यंत सुरु करण्यात आलेल्या नसल्याने संपुर्ण महाराष्ट्र राज्याच्या ओबिसी समाजावर अन्यात होत आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर आमच्या न्युजशी बोलताना खंत व्यक्त केले आहे.

नांदेड, महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED