शिवराज्य संघटनेच्या निवेदनाची दखल पंचायत समिती नायगाव येथे दारू पिऊन गोंधळ करणारा लिपिक निलंबित – विक्रम पाटील बामणीकर

    36

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.9ऑक्टोबर):-नायगाव पंचायत समितीचा लिपिक ऋषी धर्मापुरीकर यांनी दिनांक आठ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दारूच्या नशेत गटविकास अधिकारी फाजेवाड यांच्या केबिन समोर हैदोस घातला त्यांनी दोन कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला असा प्रकार घडल्यामुळे ऋषी धर्मापुरीकर यांनी नवीन गटविकास अधिकारी फाजेवाड यांना सलामी दिली.

    अशा बेजबाबदार लिपिक व दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या ऋषी धर्मापुरीकर यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिवराज्य संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील चव्हाण उपतालुका अध्यक्ष शिवाजी पाटील शिंदे यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.

    या निवेदनाची दखल घेत गटविकास अधिकारी फाजेवाड यांनी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या लिपिक कृषी धर्मापुरीकर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे अशा प्रकारामुळे नायगाव पंचायत समितीचे नाव वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या चर्चेत येत होते याअगोदर गटविकास अधिकारी महादेव केंद्रे यांनी कोणत्याच कर्मचाऱ्यावर त्यांची वचक नसल्यामुळे असे प्रकार घडला असल्याचे पंचायत समिती परिसरात नागरिक बोलून दाखवत होते.

    नूतन गटविकास अधिकारी श्री फाजेवाड यांनी निवेदनाची दखल घेऊन लिपिक ऋषी धर्मापुरीकर यांना निलंबित केले आहे.शिवराज्य संघटना ही ज्या ठिकाणी अन्याय-अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आक्रमकपणे भूमिका घेऊन वरिष्ठ पर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे व यानंतर कोणत्याही ठिकाणी असे प्रकार घडत असल्यास वेळोवेळी असे प्रकरण वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊन त्यांच्याविरोधात जोपर्यंत कारवाई होणार नाही.

    तोपर्यंत शिवराज्य संघटनेच्यावतीने पाठपुरावा करून त्या अधिकाऱ्यास निलंबित व कारवाई करण्यास भाग पाडले पर्यंत शिवराज्य संघटनेच्या वतीने आमरण उपोषण नाही करण्यात येईल असे विक्रम पाटील बामणीकर शिवराज्य संघटना जिल्हाप्रमुख नांदेड व भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष नायगाव यांनी यावेळी सांगितले आहे.