भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि, लक्ष्मीनगर, देगाव या कारखान्याकडून वारस दाराला आर्थिक मदत

33

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.9ऑक्टोबर):-बरबडा ता. नायगाव जि. नांदेड येथील गजानन उत्तमराव शिंदे यांचे कर्करोगाच्या आजाराने एप्रिल महिन्यात निधन झाले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि,लक्ष्मीनगर, देगाव ता.अर्धापूर जि. नांदेड येथे इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होते.

त्यामुळे साखर कारखान्याच्या कामगार संघटनेने त्यांच्या वारसांना आर्थिक मदत केली आहे.भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष. शिवाजीराव मोहनराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला आहे.

यावेळी बरबडा येथील ज्येष्ठ नागरिक सुरेवाड मामा ,दिगंबर धर्माधिकारी, बाबू पंचलिंग ,महेश धर्माधिकारी, सोमनाथ पचलिंग उपस्थित होते.