हाथरस येथील प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

36

🔹भारतीय बौद्ध महासभा दारव्हाचे मा.महामहिम राष्ट्रपतींना निवेदन

✒️दारव्हा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

दारव्हा(दि.10ऑक्टोबर):-भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय तरुणी मनीषा वाल्मिकी तिच्यावर 14 सप्टेंबर 2019 रोजी काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला व त्यामुळे 29 सप्टेंबर 2020 रोजी तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबांना स्वाधीन न करता तिचा मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी मध्यरात्री तिच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता जाळला.

ही बाब कायदा व सुव्यवस्थेची हानी करणारा आहे. या घटनेचा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारव्हा यांच्या तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशात राम राज्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजले असून अक्षरशः त्या राज्यांमध्ये जंगल राज दिसून येत आहे. गुन्हेगारांना सरकार व कायद्याची भीतीच राहिलेली नाही.

मनिषा वाल्मिकी तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या नराधमाला फाशी देण्यात यावे तसेच त्यात दिरंगाई करकरणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व उत्तर प्रदेशातील अशा प्रकारचा अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली.

निवेदन सादर करताना तालुका शाखेचे अध्यक्ष प्रा. सिद्धार्थ गायकवाड, सरचिटणीस प्रा. डॉ.प्रशांत बागेश्वर, कोषाध्यक्ष दीपक खडसे, सम्राट बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष आर. के. कांबळे, साहेबराव कांबळे, वरिष्ठ पत्रकार जगन बरडे, रामदासजी बोदडे, शालीकग्राम गवई, प्रा.गौतम मनवर, प्रा. अरविंद मनवर, प्रा. अजाबराव खंडारे, प्रा. अमोल कांबळे प्रा. डॉ. समाधान हिरे, एस.पी. वानखेडे, प्रा. प्रकाश तेलगोटे, अजय जाधव, भाऊरावजी चक्रनारायण, राजेश मनवर, सुनील अघमे, डीगांबर मोवाडे राजू मनवर, प्रा. रजनीकांत घुंगरराव, एकनाथ तायडे, विजयबाबू गजभिये, दिलीपराव पांडे इत्यादी मान्यवर निवेदन देण्यासाठी उपविभागीय कार्यालय दारव्हा येथ उपस्थित होते.