महाराष्ट्रातील जातीय सलोखा कोण बिघडवू पहाते ?

34

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने तु तु मै मैं का होतं आहे….??मराठा संघटना एकसुरी एका आवाजात का बोलतं नाहीत…??ओबीसी बांधवांना विश्वासात घेऊन सामाजिक सामंजस्य का निर्माण केल्या जातं नाही…??
केंद्रातील भाजपच्या सरकारने १०२ वी घटनादुरुस्ती २०१८ मध्ये घाईगडबडीने करुन जातीय मागासलेपण ठरविण्याचा राज्याचा संवैधानिक अधिकार का काढून घेतला…..??

आरक्षणासाठी आता मागास प्रवर्ग ठरविण्याची जबाबदारी ही केंद्राकडे असतांना मराठा समाजाची मंडळी केंद्रातील भाजपच्या सरकारला विचारणा करण्याऐवजी महाराष्ट्रातील सरकारला का वेठीस धरतात…??मराठा आरक्षणावर स्वत:ला तज्ञ समजून बातम्या आणि डिबेट चालविणाऱ्या मिडियाने इतर नेत्यांचे म्हणणे दाखवून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याच काम कुणाच्या इशा-या वरुन करीत आहेत…???

भाजपाचे खासदार, आम्हाला नाही तर कुणालाच नको,ही आगलावू भाषा आत्ताच का आणि कशासाठी वापरतं आहेत…??मराठा आरक्षणाला पहिल्या दिवसापासून पाठिंबा देणा-या अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चुकीचे कोटींग करुन मनुवादी मिडिया आग कशासाठी लावू पहातो आहे….??
शांत चित्ताने विचार करा…!!
जातीयता बाजुला ठेवा…!!
अहंकार आरक्षण मिळवून देणारं नाही…!!

गरीब मराठ्यांच नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या…!!विवेकानेच प्रश्न सुटेल, अहंकाराने नाही…!!
आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असे होते आहे का…??
‌वरील प्रश्र्नांची उत्तरे मिळविण्याच्या प्रामाणिक प्रयत्न केला तर माझ्या महाराष्ट्रातील मराठी भावंडांनो, मनुवादी आग लावीत आहेत हे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरातुन स्पष्टपणे दिसून येते…!!आरक्षणाचे विरोधक कोण आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही, आरएसएस हा मुद्दा घेऊन थंड डोक्याने गेम खेळतं आहे…!!

महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत हेच लक्षात येते….!!
महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडवू द्यायचा नसेल तर, बेताल वक्तव्य करणारा कुणीही असो त्याला महत्त्व देऊ नका…!!खोटारड्या मिडियाच्या बातम्या ऐकून संताप व्यक्त करु नका…!!आगलावू प्रवृत्तीची राजकीय माणसे आपली की परकी हा विषयच संपवा…!!
मराठा आरक्षण नव्या पिढीच्या सुखसोयी साठीच ना…??
मग सामाजिक सलोखा बिघडला तर दंगलीत कुणाच्या नव्या पिढ्या भरडल्या जातील…??

आरक्षण मिळवायचे की, मनुवाद्यांच्या षंढयंत्राचे बळी ठरायचे हा ऐरणीवरचा प्रश्न आता सोडवावा लागेल…!!
तर्क शक्तीचा वापर करीत पूढे जाऊ या…!!
महाराष्ट्र एकसंघ आणि खरंच पुरोगामी आहे ही दाखविण्याची संधी घालवू नका…!!

✒️लेखक:-भास्कर भोजने
( राजकीय विश्लेषक पुरोगामी चळवळीचे
भाष्यकार, विचारवंत,जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो:-9960241375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-८०८०९४२१८५