राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या १५१ वी जयंतीला सायकल रँलीचे आयोजन

107

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.10ऑक्टोबर):- जिल्हा क्रीडा अधिकारी तहसील कार्यालय नगर परिषद हिगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १०-१०-२०२० रोज शनिवारला हिंगणघाट शहरामध्ये भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये covid-19 ला आळा घालण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या घोषवाक्यचा प्रचार करण्यात आला.

सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण मा. नगराध्यक्ष श्री. बसंतानी मा. तहसीलदार श्री. मुंदडा साहेब, मुख्याधिकारी श्री. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या सायकल रॅली मध्ये किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्ट चे विद्यार्थी सहभागी झाले होते. सायकल रॅलीला प्रमुख पाहुण्यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.

शेवटी विद्यार्थ्यांना फळे बिस्कीटे देउन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ही सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी नगर तालुका संयोजक बी. एल. खांडरे किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टस क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बक्श, नगर परिषद कार्यालयाचे प्रवीण काळे यांनी प्रयत्न केले.