धाराशिव साखर कारखाना युनिट३,नांदेड सन२०२०-२१चा पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ

27

🔸प्रगतशील शेतकऱ्यांच्या शुभहस्ते प्रारंभ

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.10ऑक्टोबर):-याशुभप्रसंगी कारखाना लगतच जिरगा मारूतीचे मंदीर असून अभिषेक करण्यात आला. काटा पुजन करून ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन केले व गव्हाणीत प्रगतशील शेतकरी कैलासगिर महाराज, व्यंकटराव आरसुळे, नामदेवराव गवते, तुकाराम लुटे, शिवाजी चव्हाण, रामराव वाके, व्यंकटराव कदम, एकनाथ ढोणे, ज्ञानेश्वर जामगे, नागनाथ कुसनुरे, नागोराव घुमे, पंढरी वानखेडे, रामराव पवार, गंगाधर बोमनाळे, ज्ञानेश्वर देसाई तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष काबंळे, सुहास शिंदे व गौरव दोशी, छावा संघटनचे माऊली पवार आदी मान्यवरांच्या शुभहस्ते मोळी टाकण्यात आली.

यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचं वातावरण आहे. ऊस टनेजमध्ये ही भरपूर प्रमाणात वाढ आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने भागातील सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास गाळपास आणू. कारखान्याची सगळी कामे पुर्ण झाली आहेत. यावर्षी पाच लाख मे.टन उच्चांक गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याचे आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देऊन येथील शेतकऱ्यांला सुजलाम सुफलाम करण्यात येईल.

यावेळी भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार बांधव,कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते.