बोधेगावच्या उपसरपंचपदी सुधीर शिंदे यांची निवड

40

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी वैजनाथ(दि.11ऑक्टोबर):- तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुधीर सुर्यकांत शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल ना.धनंजय मुंडे यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य सुधीर शिंदे यांची उपसरपंचपदी एकमेव अर्ज या पदासाठी आल्याने ग्रामपंचायत सदस्यांची बैठक होऊन त्यात उपसरपंचपदी सुधीर शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

याबैठकीला ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती सोनाबाई नामदेव बनसोडे व सदस्य सर्वश्री यमुना बाळकृष्ण शिंदे, उर्मिला प्रल्हाद शिंदे, ज्ञानोबा बालासाहेब गडदे, संजिवनी भागवत रूपनर, अमत आश्रोबा गडदे, परिमळा बाबुराव गडदे,  ग्रामसेवक एम.एस.पोटभरे, मंडळ अधिकारी के.ई.मुंडे, तलाठी जाधव आदिंसह उपस्थित होते. यावेळी सरपंच श्रीमती सोनाबाई बनसोडे यांच्यासह उपस्थितीतांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुधीर शिंदे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी अंगद केशव शिंदे, अभिमन्यू विश्वनाथ शिंदे, मारोती बापुराव शिंदे, धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे मयूर शिंदे, श्रावण नामदेव बनसोडे, प्रल्हाद चंद्रकांत शिंदे, बाबासाहेब शिंदे, अभिमन्यू गडदे, सु़दर शिंदे, भास्कर गडदे आदींची उपस्थिती होती.

सुधीर शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने गावाला तरुण नेतृत्व मिळाले आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कठिबध्द आहे. गावाच्या कुठल्याही प्रश्न सोडविण्यासाठी आपण या पदाचा उपयोग करू, गावच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे उपसरपंचपदी सुधीर शिंदे यांनी सांगितले.