कोरपणा तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलावर वाढते अत्याचार विरोधात भव्य मोर्चा व निदर्शने

71

🔹महाविकास आघाडी सरकार विरोधात तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत निवेदन सादर

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.12ऑक्टोबर):-भाजपा महिला मोर्चा,भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने महा विकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर होणारे बलात्कार, विनयभंग,अत्याचार व हत्याकांड चे सत्र चालुच आहे ह्या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा महिला मोर्चा,भारतीय जनता पार्टी,युवा मोर्चाच्या वतीने कोरपना बस स्टॉप येथे भव्य आंदोलन करण्यात आले.

 तहसिलदार साहेबां मार्फत श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री साहेबांना महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले व कडक कायदा करावा अशी विनंती करण्यात आली आंदोलन श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.

प्रमुख उपस्थिती श्री संजयभाऊ मुसळे, श्री पुरुषोत्तम भोंगळे,श्री अरुण मडावी,श्री किशोर बावणे,श्री अमोल असेकर,श्री विजय रणदिवे,श्री ओम पवार,श्री दिनेश खडसे,श्री पद्माकर दगडी,श्रीमती रत्नमाला येवले,सिंधुबाई,पुष्पा आसुटकर,शकुंतला नवले, लिलाबाई, रुक्माबाई शेंडे,एजाज शेख,सुरेखा इंगोले,चांदबाई शेख, सुनिता मांदाडे, लक्ष्मी मेश्राम, शकुंतलाबाई,शोभाबाई,गयाबाई, वर्षाबाई आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.