शिष्यवृत्ती परिक्षेत वाघनख शाळेचे १०० टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

81

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.12ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे द्वारा घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख प.स.वरोरा शाळेला घवघवीत यश मिळाले असून शाळेचा शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता ५ वी चा निकाल १००% लागलेला आहे विशेष बाब म्हणजे सर्व विद्यार्थी प्राविण्यप्राप्त आहे.

१०० टक्केही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.जिल्ह्यातून एकमेव ही शाळा या सन्मानासाठी पात्र असून सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर, इयत्ता ५ वी चे वर्गशिक्षक तथा मार्गदर्शक संतोष धोटे,शाळेचे शिक्षकवृंद विज्ञान शिक्षक धनराज रेवतकर,सौ.रेखा थुटे मॕडम,कु.वैशाली गायकवाड मॕडम तसेच सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.