प्रतिभा माध्यमिक विदयालय काजळा ता बदनापूर शाळेतील विद्यार्थ्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

48

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.13ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून घेतल्या गेलेल्या सन 2020 फेब्रुवारी मधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा येथील दोन विद्यार्थी उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केलं आहे.

स्कॉलरशिपला पात्र विदयार्थीची नांवे पुढीलप्रमाणे आहेत समर्थ कैलास गरड, कृष्णा सोनाजी मदने आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे व मुख्याध्यापक सर्व शिक्षक, कर्मचारी,यांचे सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी,शाळेच्या व संस्थेच्या वतिने हार्दिक अभिनंदन तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.