उमेद अभियानच्या हजारो महिला रस्त्यावर

34

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.13ऑक्टोबर):-महाराष्ट्रातून ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियान ही संस्था बाह्य संस्थेकडे देऊ नये. खाजगीकरण थांबवून कर्मचार्‍यांना पुर्ननियुक्ती करावी या प्रमुख मागणीसाठी उमेद अभियानच्या बीड मध्ये हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि.12) भव्या मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, ग्रामविकास विभागातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्‍यांमार्फत उमेद संस्थेचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. यात वर्षानुवर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे पुर्ननियुक्तीसह विविध मागण्यासाठी उमेद अभियानच्या हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे बीड शहरातील नगर रोडसह परिसरातील मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलीस प्रशासनाकडून या मोर्चासाठी बंदोबस्त देण्यात आला होता.