अँड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणणाऱ्यांना डेमोक्रॅटिक आरपीआय व सम्यक पँथर चा औकातीत राहण्याचा इशारा

31

✒️मुंबई (पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.14ऑक्टोबर):- बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांनी आपल्या औकातीत राहावे अन्यथा घरात घुसून औकात दाखवू असा इशारा डेमोक्रॅटिक आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पँथर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.

ऍड बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः उच्चविद्याविभूषित आदर्शवादी असून भारताच्या राजकारणातील एकमेव प्रभावी व्यक्तिमत्व आहे. संविधान अभ्यासक व संविधान तज्ज्ञ आहेत. राजकारणात त्यांचा स्वतःचा एक दबदबा असून समाजात ते श्रद्धेय आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर एकमेव असे स्वाभिमानी नेतृत्व या देशाला लाभलेले आहे. शिवाय भारत भाग्य विधाते विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत.

कोणत्याही महामानवांच्या वंशजांचा आंबेडकरी अनुयायांकडून अवमान झाला, केला किंवा होनार नाही, मात्र: मनुवादी पिलावळ जर आंबेडकर घराणे व वंशजांवर जर अपमानजनक वक्तवे करत असेल तर अश्या प्रवृत्तींना ठेचून काढण्याची धमक डेमोक्रॅटिक आरपीआय व पँथर ऑफ सम्यक योद्धा आपल्यात राखून ठेवत आहे असा इशारा माकणीकर यांनी दिला.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भारतीय राजकारणातील अदभूत पैलू असून राजकारणातील भविष्यातले सर्व निकषावर ते खरे उतरले आहेत.

अभ्यासू ज्ञानी व निडर बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर असून केवळ आंबेडकर यांच्यामुळे भारत व बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतीय बहुजन समाज एकत्रित येत आहे. समता, न्याय, बंधुता व स्वतंत्र कायम टिकून राहावे यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे.
सर्व महापुरुष व त्यांच्या वंशजांचा आम्ही सन्मान करतो त्यामुळे आंबेडकर घराणे व वंशजांना अवमान होईल असे वर्तन कुणीही करून सामाजिक सलोखा बिघडवू नका आणि ऍड बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र राज्यात फिरू देणार नाही असं म्हनणाऱ्यांना त्यांच्या घरात घुसून त्यांची औकात दाखवू असा इशारा गंभीर डेमोक्रॅटिक आरपीआय व पँथर ऑफ सम्यक योद्धा च्या वतीने देण्यात आला आहे.

पँथर डॉ राजन माकणीकर यांनी बोलतांना असेही म्हणाले की बाळासाहेबांना महाराष्ट्रच काय तर संबंध देशात अडवणारे माईचे लाल अजून जन्माला आलेले नसून आंबेडकर घराण्याच्या संरक्षणार्थ पँथर ऑफ सम्यक योद्धा ची निर्मिती पूज्य भदंत शिलबोधी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली झाली आहे.

अश्या दांभिक प्रवृत्तींना रोखण्यासाठी युवाध्यक्ष डेमोक्रॅटिक आरपीआय कनिष्क कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रदेश महासचिव पँथर श्रावण गायकवाड, सम्यक पंथेरचे सचिन भूटकर, उपाध्यक्ष वीरेंद्र लगाडे, राजेश पिल्लई, मनीष यादव राज्यभर कार्य करत आहेत.

70 वर्षात ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजले नाहीत अश्यांना ऍड. बाळासाहेब आंबेडकर काय समजतील अशी प्रतिक्रिया सम्यक पँथरचे कार्याध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.