नर माकडाच्या हल्ल्यात शेतमजुर गंभीर जखमी

79

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.14ऑक्टोबर):- बुधवारला सकाळच्या सुमारास मौजा कोल्ही(खेकडी) ता.हिंगणघाट येथील रहिवाशी चंद्रभान बापुराव कौरासे हे कपाशीच्या शेतात तण काढीत असतांना नर माकडाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवून जमिनीवर पाडले, नर माकड एवढ्यावरच थांबले नसुन त्याने सदर इसमाच्या डोळ्याखालील भागावर हल्ला करून रक्तबंबाळ केले.

जीव वाचवण्याच्या आकांताने शेतमजुराचा आवाज ऐकून शेजारच्या शेतातील शेतकऱ्यांनी सदर इसमाला माकडाच्या तावडीतून सोडवले. कोल्ही शिवारामध्ये वन्य प्राणी अक्षरशः हैदोस घालत आहेत. मागील अनेक दिवसापासून शिवार सोडून माकडं गावात येऊन घरावर उड्या मारून मोठं नुकसान करत आहेत. माकडाच्या अचानक झालेल्या या हल्ल्यात शेतमजूरास काय करावे समजत नव्हते. घटनेनंतर सदर इसमास प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तिथे लस उपलब्ध नसल्यामुळे मलमपट्टी करुन घरी पाठवले.

खाजगी दवाखान्यात उपचाराकरीता जवळ दमडीही नसल्यामुळे उपचाराविना सदर इसमास त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत वनविभागाचे अधिकारी यांनी यात लक्ष घालुन सदर इसमास उपचार व आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.