लॉकडाउन काळात दिव्याग व्यक्ती करिता माझी भूमिका

32

कोरोना या सुरवातीच्या काळात मार्च अखेर एप्रिलच्या सुरवातीपासुनच गरिब दिव्यांग हा या जग बंद असलेल्या काळात फार मरणासन्न अवस्थेत झाला. काय खावे काय प्यावे जिवन कसे चालवावै या विवंचनेत पडला त्याठिकाणी तो हतबल झाला बाहेर बंद घरात अन्नाचा कण नाही. अन्न आहे तर शिजवायला गँस नाही.

अशी परिस्थिती या परिस्थितीला मी मनोज मूरलीधर नगरनाईक विराट दिव्यांग फाऊन्डेशन तसेच संपादक साप्ताहिक दिव्यांग शक्ती च्या माध्यमातुन त्या निराधार दिव्यांगांना आधार देण्यात यावा याकरिता बंद असलेल्या लाँक मध्ये कामचालु करण्याचे ठरविले, मग दानशुर व्यक्ति,डाँक्टर,सामाजीक संस्था, ऊद्योगपती, हिन्दुस्थांन युनिलिव्हर,पारले बिस्किट, यश एन्टरप्राईज (पियर्स साबण) दिल्लि येथिल एनजिओ लाईफ नेट च्या माध्यमातुन सतत पाठपुरावा करुन किराणा ,औषधी हजारो दिव्याग बांधवापर्यन्त पोहचविण्याचे काम केले व अजूनही चालु आहे.

तसेच नगरपिरषदेला या कोव्हिड 19च्या काळात जवळपास शहरिभागातील 564दिव्यांग बांधवांना घरपोच किट देण्यास बाध्य केले, काहि बांधवांना लहानमुलांनसाठी बिस्किट, ब्रेड, चटपटित असलेल्या पदार्थही पोहचविण्याचे काम केले,याची दखल खामगाव प्रेस कल्ब तसेच बुलढाणा जिल्हा ग्रामिण पत्रकार संघ ने घेऊन सन्मानित केले.

नेहमी दिव्यांग बांधवांचा ध्यास घेत त्यांच्या असलेल्या अडिअडचणी सोडविण्यासाठी नेहमी तत्पर आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या आमसभेमघ्ये दिव्यांग शक्ति योजना ज्यामध्ये दिव्यांग विद्यार्थी पहिली ते दहावी पर्यन्त शिक्षणासाठी 2000/-रुपये अनुदान तर दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी 30000/-अनुदान सतत लावुन धरलेल्या मागणीने दि. 13/07/2020 ला सभे मध्ये मंजुर करण्यात आले हे संपुर्ण राज्यात कदाचित पहिलेच दिव्यांग विकासाचे न. प. चे पाऊल असेल दिव्यांग विकास हा शेवटच्या बांधवापर्यन्त पोहचविणे मी मनोज नगरनाईक सतत प्रयत्नरत राहणार आहे.

✒️मनोज मुरलीधर नगरनाईक
रा. अभय नगर
खामगाव जि. बुलढाणा444303
मो:-7770010084,9422930094

▪️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260