हळदा येथील वृद्ध वाघाच्या हल्ल्यात ठार

65

🔸किती लोकांचा रक्त पिणार वाघ?

🔹ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाची दहशत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.15ऑक्टोबर):- तालुक्यात दिवसेदिवस वाघाची शिकार वाढत चालवली आहे. कधी लहान मुलं तर कधी युवक, आणि आता तर वृद्ध व्यक्तीला वाघांनी आपली शिकार बनवली आहे. तालुक्यात दक्षिण भागात येणाऱ्या वन क्षेत्रात भागातील हळदा या गावातील वृद्धाचा वाघाने जीव घेतला. मृतक वृद्धाचे नाव उमाजी कुशन मस्के वय 70 वर्षे, रा. हळदा ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून, हा वृद्ध गावाजवळील जंगलात आपल्या उदरनिर्वाहा साठी शेळी चरायला नेत असे.

परंतु दुर्दैवाने उमाजी यांचं काळ आला आणि वाघांनी उमाजी यांच्यावर हल्ला करून त्यांचा जीव घेतला. उमाजी मस्के हा काल पासून घरी न आल्याने गावात कुजबुज सुरु झाली, आणि गावातील लोकांनी चौकशी केली असता उमाजी मस्के यांचा मृतदेह जंगलात सापडला. गावात वाघाच्या दहशतीने भीती निर्माण झाली असून याच्यावर तातडीने बंदोबस्त करण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस व वन विभाग करीत आहेत.