राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

67

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.15ऑक्टोबर):- जगाला मानवता धर्माचे संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची आज 52 वी पुण्यतिथी प्रित्यर्थ श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचन ता.ब्रम्हपुरी जी. चंद्रपूर येथे कोविड च्या नियमाचे पालन करून पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री. सुबोधदादा, मार्गदर्शक व संचालक अड्याळ अड्याळ टेकडी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नवलाजी मुळे अध्यक्ष अड्याळ टेकडी, श्री. लक्ष्मणरावजी दोनाडकर गुरुजी रनमोचन, डॉ. गोकुलदासजी बालपांडे, राजू महासाहेब, राकेश प्रधान, चोरूजी दोनाडकर, नरेश प्रधान,घनश्याम दोनाडकर, पटवारी भर्रे, पराग राऊत व समस्त गावकरी मंडळी होती.

ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मान्यवरांनी अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. संपूर्ण देशामध्ये कोरोना हाहाकार असल्यामुळे सोशल डिस्टन चे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.