ब्रम्हपुरी येथे 64 वा धम्मचक्र दिन साजरा

39

🔹मोफत मास्कचे वाटप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी ( दि. 14 ऑक्टोबर ):- आज तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती चाळ ब्रम्हपुरी येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून जि.प. सदस्य मा. राजेश कांबळे सर तसेच बांधकाम समिती न.प. मा. विलास विखार उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रफुल ढोक अध्यक्ष चाणक्य समाज सेवी ग्रुप, उपाध्यक्ष निकेश पंचभाई, तसेच व्यापारी संघटनाचे अध्यक्ष सोनू दुनेदार, सहसचिव विलासभाऊ वैद्य, योगेश उरकुडकर, शेखर फटिंग, उत्पल नागदेवते, दिनेश गायकवाड सुशील लोखंडे, पवन बनकर कॉलेज रोड दुकान लाईन ब्रम्हपुरी येथे सर्वांच्या उपस्थितीत पार पाडले.