कर्मचारी पेंशन योजनेअंतर्गत (ईपीएस ९५) महागाई भत्याला जोडून कमीत कमी ९००० मासिक पेंशन लागू करा

27

🔹खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची राज्यपालां सोबत चर्चा

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15ऑक्टोबर):-कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारा संचालित कर्मचारी वेतन योजना १९९५ (ईपीएस ९५) संपूर्ण भारतातील ६५ लाख पेंशनर्स चे संरक्षणासाठी त्यांच्या हितासाठी कमीत कमी ९ हजार मासिक पेंशन लागू करावी व हि पेंशन केंद्र सरकारतर्फे वेळोवेळी लागू होणाऱ्या वाढीव महागाई भत्याला जोडावी अशी आग्रही मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेटीदरम्यान केली.

केंद्र सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निधी संघटने तर्फे सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील औद्योगिक कर्मचारी सहित वेगवेगळ्या संस्थातील कर्मचारी यांना ५८ व्या वर्षाच्या सेवानिवृत्तीनंतर वृद्धपकाळात सुरक्षित जीवनासाठी १६ नोव्हेंबर १९९५ पासून (ईपीएस ९५) कर्मचारी पेंशन योजना राबविल्या जात आहे. परंतु यामध्ये अनेक त्रासदायक बाबी असून अत्यल्प पेंशनमध्ये कुटुंब चालवीत आहेत.

सध्यस्थितीत महागाई भत्याला न जोडता केवळ १००० मासिक पेंशन लागू आहे. वृद्धपकाळात पती – पत्नी दोघांचे पालन पोषण होणे अशक्य आहे. वृद्धापस्थितीत वैद्यकीय खर्च व खानपान सहित इतर अत्यावश्यक खर्चासाठी महागाई भत्याला जोडून कमीत कमी ९००० हजार मासिक पेंशन लागू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.