मुख्यमंत्री व राज्यपाल साहेब तुमच्या “हिंदुत्वाने” जनतेची केवळ छातीच फुगते पोट भरण्यासाठी मात्र भाकरच खावी लागते – शिरीष भोसले

32

🔹हिंदुत्वाचा मुद्दा सोडा शेतकऱ्यांच काहीतरी बोला-शिरीष भोसले

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.15ऑक्टोबर):-हिंदुत्वाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयांच जे शीतयुध्द सुरु आहे त्याने काहीच साध्य होणार नसुन महाराष्ट्रातील भोळ्याभाबड्या जनतेची केवळ छातीच फुगणार आहे.परंतु जिंवत राहण्यासाठी भुक भागवण्यासाठी छाती फुगवून उपयोग नाही त्यासाठी माणसाला जेवनभाकरच खावी लागते त्यामुळे तुमच हिंदुत्व थोड बाजुला ठेवा व महाराष्ट्रातील शेतकरी जनतेला त्यांच्या हीताच्या योजना आखुन दिलासा द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी केली आहे.

तळागाळातील जनतेचे मुळ प्रश्न,अडीअडचणीचे मुद्दे,महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या व गरज नसणाऱ्या माथे भडकाऊ गोष्टी त्यामध्ये जातीयवाद,धर्मवाद,हिंदुत्वाचा श्रेयवाद,सुशांतसींग,रिया-चक्रवर्ती,कंगणा राणावत,आरक्षणाचा गोंधळ,नेत्यांच्या टीका प्रतीटीका,इत्यादी बीनकामाच्या गोष्टी पुढे करुन मुळ मुद्द्याला भरकटवायचे व व्यर्थ गोष्टींना अतीमहत्व देण्याचे काम सध्याच्या घडीला सुरु असल्याच स्पष्ट दिसत आहे.
आज बळीराजावर निसर्गाने अतीवृष्टीची अवकृपा दाखवुन पिकांच कोट्यवधी रुपयांच नुकसान केलं आहे.

दुष्काळ,नापीकी,कर्जबाजारी,महागाई,शेतकरी विरोधी कायदे व धोरणे,इत्यादी विषारी घटक हे शेतकऱ्यांचा जिव घेत आहेत त्यामुळेच मराठवाडा व विदर्भात रोज दहा विस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकतच असाल,मायबाप सरकार म्हणून मी आपल्याला सांगु इच्छितो की कृषीप्रधान देशात जर किसान बांधवांच्या रोजच अशा आत्महत्या व्हायला लागल्या तर तीथे तुमच हिंदुत्व या आत्महत्या थांबवु शकेल का? असा प्रश्न मला पडतो त्यामुळे मायबाप राज्यपाल व मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या दुखा:बद्दल तुम्हाला जर संवेदना जाणवत असतील व वेदना होत असतील तर तुम्हाला तुमच हिंदुत्व,पक्ष बाजुला ठेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येला व परिस्थितीला जबाबदार असणार्या योजना म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव,कायमची कर्जमुक्ती,खेड्यांच सशक्तीकरण,शेतीमध्ये मशागतीसाठी यांत्रीकीकरण,शेतकर्यांच्या पिकांवर प्रकीया करणारे उद्योग,व परीणामी रोजगार व शेतमालाला बाजारपेठ,तसेच शेतकरी विरोधी कायदे व धोरणे नष्ट करावे लागतील.

कीतीही सरकार येतात आण जातात मात्र शेतकऱ्यांच्या पदरी असणार दु:ख त्याचा पीछा सोडत नाही हे दु:ख नाहीसे होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडुन सर्वसामान्य नागरीकांना व शेतकऱ्यांना मोठ्या आश्या अपेक्षा आहेत त्यामुळे मुख्यमंत्री व राज्यपाल महोदयांनी हिंदुत्वाच्या श्रेयवाद घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच कल्याण करुन आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी केले आहे.