हाथरस प्रकरणी पुसद येथे बहुजन क्रांती मोर्चा चे भव्य रॅली प्रदर्शन

38

✒️बाळासाहेब ढोळे(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.16ऑक्टोबर):-बहुजन क्रांती मोर्चा पुसद व इतर 32 सामाजिक संघटनांच्या वतीने हाथरस येथील मनीषा वाल्मीकि बलात्कार व हत्याकांड तसेच बलरामपुर, बांदा, आजमगड, दरभंगा, खरगौन इत्यादी ठिकाणी बहुजन समाजातील मुलींवर झालेल्या बलात्कार व हत्या करण्याच्या विरोधात व उत्तर प्रदेश सरकार व पोलिस प्रशासन आरोपींना साथ देत असल्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा पुसदने भव्य रॅली काढून निषेध व्यक्त केला.

सध्या देशात बहुजन समाजातील मुलींवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्याचे गुन्हे देशात विशेषत: उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तेथील सरकार पिडितांसोबत सोबत राहण्याचे सोडून अपराध्यांना वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे. तसेच केंद्र सरकार शेतकरी विरोधी अध्यादेश, श्रमिक विरोधी अध्यादेश, तसेच सरकार द्वारा विद्युत विभाग, बीएसएनएल, रेल्वे, आदी 29 सरकारी विभागाचे खाजगीकरण करून बहुजन समाजाचे खच्चीकरण करत आहे.

या सर्वांच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने भव्य रॅली काढून निषेध व्यक्त केला व पीडित परिवारांना एक करोड रुपये आर्थिक मदत, संरक्षण, एक सरकारी नोकरी, घर देण्याची मागणी बहुजन क्रांती मोर्चाने केली. बहुजन क्रांती मोर्चाने ह्या सर्व प्रकाराच्या विरोधात चार टप्प्यात राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.

त्याप्रमाणे प्रथम टप्पा 8 ऑक्टोबर रोजी धरणे प्रदर्शन, 15 ऑक्‍टोबर रोजी रॅली प्रदर्शन करण्यात आले व पुढे 22 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश बंद व चौथा टप्पा 30 ऑक्टोबर रोजी देशव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. या सर्व आंदोलनात बहुजन समाजातील प्रत्येक संवेदनशील माणसाने सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन क्रांती मोर्चा पुसदने केले आहे.

यावेळी गणपत गव्हाळे, आयुब खान तहसिन, पुंजाराम हटकरे, सुभाष धुळधुळे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले,किशोर नगारे, कुलदीप देवसरकर,वर्षा देवसरकर, अशोकबाबा उंटवाल,मोलाना हाफीज मोबिन,मौलवी शे.निसार,सै.सिद्दिकोद्दीन, जय उंटवाल, प्रकाश नकवाल, सुनील टाक, संजय पवार, रंजीत सांबरे, भारत डागर, रणजित सांबरे, गोपाळ सारसर, लक्ष्मण डंगोरिया, विजय पवार, मनोज पवार, नामदेव इंगळे, विकी सारसर, पापासाल सोनवाल, कुलदीप देवसरकर,बाळासाहेब वाठोरे, बंडूभाऊ गंगावणे, बालाजी कांबळे, भारत कांबळे, दिलिप गायकवाड, राज नकवाल, निलेश सांबरे, शशी सारसर, सुरज टाक, संतोष डागर, हर्षल बेलपत्रे, विशाल धोत्रे, कुणाल पटने, संतोष पानपट्टे, रितेश उबाळे, विकास गडधने, अजय गावंडे, मुकेश नकवाल, अशोक सुंडे, मुकेश पवार, समाधान मनवर, विक्रम राजपूत, अक्षय धुळधुळे, करण ताळी कुटे, रोहित नकवाल,विजय सोनवाल, श्रीकांत सुरोसे, अमन नकवाल, मोहम्मद इस्त्राईल, रोहित नकवाल, संतोष उंटवाल, भारत डागर, विकी सारसर, आकाश सांबरे, रंजीत सांबरे, अशिष सांबरे, अजय गावंडे, ललित नकवाल, गणपत उंटवाल, गणेश डंगोरिया, विक्रम राजपूत, शेख तनवीर मोहम्मद फैजान, करण टाळीकुटे, संजय पवार सुनील टाक आदी शेकडो नागरीक हजर होते.