मौजे लवूळ येथील शौचालयाचा लाभ उचलण्यासाठी बहुभूधारक असतानाही अल्पभूधारक प्रमाणपत्र देणाऱ्या भ्रष्ट तलाठ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा – नईम अत्तार

45

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.16ऑक्टोबर):-बीड येथील माजलगाव तालुक्यातील मौजे लवुळ येथील २०१७ ते २० पर्यंतच्या कार्य काळापर्यंत लाचखोर तलाठ्यांनी मौजे लवूळ येथील गावकऱ्यांकडून आर्थिक व्यवहार करून शेती असणाऱ्या बड्याबड्या शेतकऱ्यांना सौचालयाच्या व इतर लाभासाठी भूमिहीन प्रमाणपत्र दिलेले आहे.

तरी त्यांचे चालू वेतन बंद करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग बीड ( गवई गट ) नईम अत्तार यांनी निवेदन मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे दिले आहे.

याच मागणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी माजलगाव, तहसीलदार माजलगाव यांनी तीन महिने होऊनही अद्याप कसलीही कार्यवाही न केल्यामुळे मा. आयुक्त साहेबांनी सदरील प्रकरणाचे गांभीर्याने संबंधित तीन लाचखोर भ्रष्ट तलाठ्यावर चालू वेतन बंद करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करूनब त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

अन्यथा १० दिवसांमध्ये लोकशाही मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. त्यात काही प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधितावर राहील. असे निवेदन नईम अत्तार – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक विभाग बीड ( गवई गट ) यांनी दिले आहे.