विहिरीतील माणूसभर खोल पाण्यातून मोटारपंप काढण्याचे एक त्याच कौशल्य

33

🔹जवळपास 70 शेतकऱ्यांचं मोटारपंप काढले बाहेर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.17ऑक्टोबर):- जवळ पास दीड महिना येऊन गेलेल्या वैनगंगा नदीच्या महापुरामुळे शेतकऱ्याच्या विहिरीत माणूस माणूस पाणी आलेला असून या पाण्यात खूप शेतकऱ्यांचे मोटारपंप पाण्यात बुडून आहेत. हे मोटारपंप कसे काढायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला.

परंतु शेतकऱ्यांच्या मदतीला सुरेश गोमाजी उपरीकर रा. पिंपळगाव हा धावून आला. सुरेश ने जवळपास 70 मोटारपंप आपल्या जिवाला धोक्यात घालून पिंपळगाव व अर्हेर- नवरगाव येथील मोटारपंप बाहेर काडून शेतकऱ्यांना मदत केली. यात सुरेश ला काही प्रमाणात मिळकत पण मिळत होती. सुरेश ला लहानपणा पासून पोहण्याचे छंद असल्यामुळे दम रोकण्याची कला अवगत झाली होती.

त्यामुळे माणुसभर पाण्यातून सुरेश ने मोटारपंप काढून शेतकऱ्यांची सहायता केली. अश्या जिगरवाल्या माणसाला खरंच प्रशासनाने सन्मान करून सत्कार करायला पाहिजेत.ब