हिंगणघाट येथे रेडिमेड दुकानाला भीषण आग

32

🔹आगीत अंदाजे 45 लाख रुपयांची नुकसान

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.17ऑक्टोबर):-स्थानिक जग्गनाथ वार्ड येथील मस्जिद मार्गावर स्थित वर्धमान टेक्सटाइल्स या रेडीमेड कापड दुकानासह निवासस्थानाला आज दि.१७ रोजी पहाटे ३ वाजताचे सुमारास भीषण आग लागून ४५ लाख रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आगीत दुकान मालक सुनील पितलीया तसेच त्यांची पत्नी कोमल पितलिया, मूलगा राज ,मुलगी रिया जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आग वीझवताना सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्निशामन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे. सुनील पितलिया यांचे जगन्नाथ वार्ड येथील मस्जिद मार्गावर वर्धमान टेक्सटाइल्स हे कापड दुकान असुन पहिल्या माळ्यावर कुटुंबियांचे निवासस्थान आहे.

आज पहाटे तीन वाजताचे सुमारास दुकानाला आग लागली , यात मोठ्या प्रमाणात रेडिमेड कापड साहित्य होते. आग लागल्याने धुराचे लोट पहिल्या व दुसऱ्या माळ्यापर्यंत पोहचले. यावरच्या दोन्ही माळ्यावर पितलिया यांचे निवासस्थान आहे. आगिमुळे प्रचंड उकाड़ा निर्माण झाल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले. पहिल्या माळ्यावर आगीचे लोट पोहचल्याने कुटुबातील सदस्यांनी जीव वाचवीण्याकरिता पहिल्या माळ्यावरिल बालकनी तुन टिनाचे शेडवर उडया मारल्या व खाली सुखरूप उतरले परंतु आगिच्या झळा लागल्याने ते कोरकोळ जखमी झाले.

दरम्यान आगीचे लोट दिसू लागल्याने शेजारी जागे झाले. त्यांनी लगेच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला माहीती दिल्यानंतर लगेच अग्निशमन दल दाखल झाले व आग विझविली परंतु तत्पुर्वी दुकानातील व घरातील पूर्ण साहित्य जळून खाक झाले.

दरम्यान आग विझविताना सिलेंडरचा स्पोट होऊन अग्निशामन दलाचे नितिन जंगले व गणेश सायंकार हे दोन कर्मचारी जखमी झाले. माहिती मिळताच महसुल विभागाचे मंडळ अधिकारी प्रशांत निनावे,तलाठी रामकृष्णा घवघवे यांनी घटनास्थळी पोहचुन आगित अंदाजे ४५ लाख रुपये नुकसानीचा अहवाल तहसील प्रशासनाला सादर केला आहे.