साकळगांव ता.घनासावंगी येथे वृद्ध महिलेला गंभीर मारहाण

32

🔸घनासावंगी पोलिसांत तक्रार दाखल

🔹तत्काळ कठोर करवाई करून , गुंड प्रवृतीस आळा घालण्याची मागणी

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.17ऑक्टोबर):-घनासावंगी पोलीस स्टेशन हद्दीतील साकळगांव तालुका घनासावंगी जिल्हा जालना येथे वृद्ध महिलेला गंभीर मारहाण करीत संगनमताने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला व शिवीगाळ करण्यात आली.
सविस्तरपणे वृत्त असे की, तक्रारदार तुकाराम अन्शिराम (वय70वर्ष) रा.साकळगांव ता.घनासावंगी यांनी घनासावंगी पोलिसांत तक्रार दाखल केलीय की, त्यांची पत्नी रुक्मिण तुकाराम गोरे (वय 65 वर्ष)(NCR NO-00774/2020 दिनांक-13/10/2020) घरी एकटी असतांना त्यांचे शेजारी राहणारे आरोपी भारत आसाराम गोरे, (वय 30 वर्ष ),आसाराम संभाजी गोरे (वय 50 वर्ष),गिरिजा आसाराम गोरे (वय 50वर्ष) आणी त्यांच्या दोन सुना (वय 25वर्ष)वरील सर्व राहणार साकळगांव ता.घनासावंगी जि.जालना.यांच्या विरोधात घनासावंगी पोलिसांत एन सी आर दाखल करण्यात आला.

तक्रारदार तुकाराम अन्शिराम गोरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, वरील सर्वांनी त्यांच्या पत्नी रुकमीन गोरे घरी एकटी असताना तूमच्या घराच्या पत्र्यावरुन पडणारे पावसाचे पाणी आमच्या (आरोपीच्या)अंगणात का आले म्हणून संगनमत करून प्राणघातक हल्ला केला व जबरी मारहाण करून, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच अत्यंत घाण अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली सदरील आरोपींवर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व न्याय द्यावा व पुढील येणाऱ्या दिवसांत काही अनुचित प्रकार घडू नये यांसाठी पोलिसांनी पावले उचलावीत अशी मागणी श्री तुकाराम गोरे यांनी केली आहे.
तसेच तक्रारदार तुकाराम गोरे यांचे मुंबईस्थित मुलगा असणार मुलगा यांनीही डिजिटल माध्यमातून डी वाई एस पी व पोलीस निरीक्षक घनासावंगी यांना गुन्ह्याची दखल घेऊन कारवाई करावी असं म्हटलं आहे.
त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेल्या *संदेशात पुढीलप्रमाणे म्हटलं आहे* की,
प्रति
*डी वाई एस पी,*
*पी एस आई*

*विषय: रूखमिन गोरे(वय 65 )याना मारहाण व शिविगाळ केली*
*संदर्भ-: NCR NO 0774/2020 Date* *13/10/20 तक्रार दार तुकाराम अन्सिराम गोरे (वय 70) रा साकळगाव ता घनसावंगी जि. जालना*

*आरोपी/ तक्रार दाखल भारत आसाराम गोरे,(वय 30)आसाराम सभाजी गोरे ,(वय 55)गिरजा आसाराम गोरे ,(वय 50 )आणि त्या च्या दोन सुना (वय 25)इ.रा साकळगाव ता घनसावंगी जी जालना*
*महोदय*
*मी अन्सिराम तुकाराम गोरे माझी आईला मारहाण, प्राणघातक हल्ला, जीव जाईल असं क्रूत्य व शिवीगाळ केल्याने मी आपल्याला विनंती करतो की आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी कारण या नतर गुन्हेगारीस वाव मिळणार नाही*
*1) सर मी नोकरी करिता मुंबई येथे असून covid 19 on duty (श्री मदन नागरगोजे (आयएएस) यांच्या नेतृत्वाखाली खाजगी हाँस्पिटल लेखापरीक्षण करणे.) वर असल्याने मला रजा मिळत नाही*
*2)माझे आई वडील गावी राहात असून त्यांना आमच्या भावकीतील हे लोक वारंवार त्रास देत असून त्याच्या वर कारवाई करावा,गुन्हेगारी आळा बसेल*
*3)माझे आई वडील गावी दोघे राहात असल्याने त्याना भविष्यात काही होवू नये यासाठी आपण प्रयत्न करावा .अशी आपणांस विनंती*