नुतन एस. पी. जयंत मिना यांनी पदभार स्वीकरल्यानंतर गंगाखेड पोलीसठाणे झाले सतर्क

96

🔺विना परवाना देशी दारूची अवैध विक्री करणारे अटकेत

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.17ऑक्टोबर):-गंगाखेड शहरातील नवा मोंढा भागात विना परवाना देशी दारुची अवैध रित्या विक्री करण्यासाठी नेणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. सविस्तर माहिती अशी की फिर्याद दि . १६ आॅक्टोबर २०२० रोजी रंगनाथ पांडुरंग देवकर वय ५१ वर्ष पोह/९१८ने .पो.स्टे.गंगाखेड जि.परभणी सरकार तर्फे फिर्यादी होऊन फिर्याद लिहुन देतो की , मी सुमारे तीन वर्षा पासुन पोलीस स्टेशन गंगाखेड येथे पोह म्हणुन नेमनुकीस असुन शहर बिट क्र . १ व २ मध्ये बिट अमलदार म्हणुन काम करतो.

दि.१६ आॅक्टोबर २०२० रोजी मा.पो.नि.साहेब यांचे तोंडी आदेशाने मी व सोबत सपोनि कोकाटे साहेब , पोना कोंडरे , पोशि आळसे असे स्टे.डा.नोंद क्र . ३८ वेळ ४:३८ वाजत अवैद्य धंद्याची माहीती काढुन केसेस कामी गंगाखेड शहरात पेट्रोलींग गस्त करीत असताना.दिलकश चौक येथे आलो असता , गुप्त बातमीदार मार्फत माहीती मिळाली की , एक ईसम अंगात लाल काळय रंगाचे शर्ट व निळसर रंगाची पँन्ट अशा वर्णनाचा लाल रंगाचा अॅप्पे लोडींग अॅटो मध्ये देशी दारू माल घेवुन मोढा भागातुन आदालत रोडकडे येत असल्याचे खात्रीशिर माहिती मिळाल्या वरुन आम्ही दोन पंचांना बोलावुन घेवुन त्यांना रेड बाबत माहीती देवुन , आम्ही अशोक किराणा स्टोअर्स नवा मोढा गंगाखेड येथे येवुन दबा धरुन थांबलो असता.

आम्हास वरील वर्णनाचा ईसम व ॲटो दिसला असता , आम्ही त्यास ठिक ४:३५ वाजेच्या सुमारास. छापा मारुन पकडले. त्यास त्याचे नाव गाव विचारले.त्याचे नाव ज्ञानेश्वर रमेशराव रेवनवार वय २० वर्ष धंदा व्यापार रा. इंदेवाडी ता . जि . परभणी असे सांगीतले . त्यास दारु बाळगण्याचा परवाणा विचारला असता नसल्याचे सांगीतले.सोबतचे दोन पंचासमक्ष त्याचे अॅटोची झडतीचा उद्देश कळवुन अॅटोची झडती घेतली असता.

खालील वर्णनाचा प्रोबीशन गुन्हयाचा माल मिळुन आला. १६ ,९ ७६.०० रु. एका लाल रंगाच्या लोडींग अॅप्पे अॅटो मध्ये देशी दारु भिंगरी संत्रा नावाचे लेबल असलेले खाकी रंगाचे ०६ कार्टून बॉक्स मध्ये देशी दारु भिंगरी संत्रा नावाचे लेबल असलेल्या २८८ सिलबंद काचेच्या बॉटल प्रत्येकी ५२ रु . प्रमाणे एकुण १४,९ ७६ / रु.कि.अ. २ ) ९ ३,०००.०० रु . एक लाल रंगाचा लोडींग अॅप्पे आटो क्र . एम . एच . २२ – १७ ९ ७ जु.वा किंमत आं . एकुण १,०७ ९ ७६ रु . वरील मुद्देमाला पैकी आम्ही एक १८० एम.एल.ची देशी दारु इत भिंगरी संत्रा नावाचे लेबल असलेली काचेची सिलबंद बॉटल पंचांच्या सह्याच्या चिठया लावुन जागीच लाख सिल मोहर करुन सि.ए. तपासणी कामी वेगळी राखुन ठेवली व बाकी माल पंचासमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करुन मुद्देमाल पुराव्या कामी ताब्यात घेतला आहे.

तरी दि .१६ आॅक्टोबर २०२० रोजी ४:३५ वा . आशोक किराणा स्टोअर्स नवा मोंढा गंगाखेड येथुन ज्ञानेश्वर रमेशराव रेवनवार वय २० वर्ष धंदा व्यापार रा . इंदेवाडी ता . जि . परभणी हा विनापरवाना बेकायदेशिररित्या प्रो . गुन्हयाचा माल चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने स्वताचे फायदयासाठी लाल रंगाचे लोडींग अॅप्पे आटो क्र . एम . एच . २२ – १७ ९ ७ वहातुक करुन घेवुन जात असतांना मिळुन आला . म्हणुन त्याच्या विरुध्द कलम ६५ ( ई ) ८३ म.पो.का. प्रमाणे कायदेशिर कारवाई केली.