गांधी फाउंडेशन ने गुंडाळली गांधीजींची तत्त्वे

26

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेने गांधीजींच्या तत्वांनाच बगल देण्याचे काम केले…!खरंतर कोरोना आणि टाळेबंदीच्या कठीण काळात ऑनलाइन पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करणे आणि अनेक विद्यार्थ्यांना वक्तृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही कौतुकाची बाब असली तरीही या फाउंडेशनच्या ढिसाळ संयोजन कारभाराने आणि त्यात घडलेल्या अनेक गांधी तत्वांविरोधीच्या गोष्टींनी या स्पर्धेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले..!

मुळातच कुठल्याही स्पर्धेचे आयोजन करताना त्याची नियमावली तसंच स्पर्धेच्या निकालाचे निकष लिखित स्वरूपात असणं आणि ते जसेच्या तसे पाळले जाणं हा संकेत असतो परंतू गांधी फाउंडेशन आयोजित स्पर्धेच्या पत्रकातच नियमावलीचा आणि निकालाच्या निकषांच्या संदर्भाचा आभाव दिसून आला तसंच संयोजकांकडे चौकशी केल्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची नियमावली सांगितली गेली. ज्यामुळे अनेक स्पर्धकांची दिशाभूल झालेली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही..!

जेव्हा ऑनलाइन माध्यमातून जनमत घेतलेलं असतं तेंव्हा जनमताचा कौल पाळणं हादेखील एक संकेत आहे परंतु याही बाबतीत फाउंडेशनचा कारभार समोर आला जर स्पर्धेच्या निकालात जनमताचा निकष अपेक्षित नसेलच तर तो घेणं कितपत योग्य..? तरीही तो घेतला गेला आणि ग्राह्य धरण्यात आला नाही.ज्या चॅनल वरती या स्पर्धेचे व्हिडीओज अपलोड करण्यात आले होते तिथे काही स्पर्धकांचे व्ह्यूज आणि लाईक्स अचानक कमी होणे, बदलणे, लिंक ओपन केल्यानंतर व्ह्यूज आणि लाईक काउंट न होणे अशा प्रकारचे चैनल हॅकिंग सारखे प्रकार समोर आले.

ज्या गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना भारतातून जाण्यास भाग पाडलं त्या गांधीजींच्या नावे चालवल्या जाणाऱ्या फाउंडेशन आयोजित वेबिनार मध्ये एकही व्यक्तीने भारताची राष्ट्रभाषा असलेली हिंदी भाषा वापरू नये..? आणि केवळ आणि केवळ इंग्रजी भाषेचा वापर व्हावा ही अतिशय खेदाची बाब आहे.हा वेबिनार ऐकताना भारताची राष्ट्रभाषा बदलली की काय .?असा प्रश्न अनेकांना पडला असल्यास ते वावगं ठरणार नाही..!

अस्खलितपणे इंग्रजी भाषा बोलणारे अनेकजण असतीलही परंतु जेव्हा राष्ट्रपिता असलेल्या व्यक्तीच्या नावे एखादा फाउंडेशन आपण चालवतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त काही स्पर्धांचे आयोजन करतो तेव्हा ह्यात भारताची राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी भाषेचा वापर होणे गरजेचं होतं..!विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ पाहता नेमक्या कुठल्या निकषांवर स्पर्धेचे विजेते ठरवले गेले असा प्रश्न निष्णात वक्त्यांना सहाजिक पणे पडलेला असू शकतो.

कारण वक्तृत्वाचे निकष जसे देहबोली विषयाची माहिती, शब्दफेक किंवा इतर अनेक निकष पडताळले गेले किंवा नाही, की केवळ स्पर्धेचा निकाऽऽल लावण्यात आला हा प्रश्न पडतोय.
एकंदरच गांधीजींचे तत्व आणि मूल्य व सत्य ह्या गोष्टी सपशेल गुंडाळून ठेवण्यात मात्र फाऊंडेशनला यश मिळालय असं म्हणायला हरकत नाही..!

✒️लेखिका:-सौ. सायली कस्तुरे- बोर्डे

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620