राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर

34

🔸शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधून अडीअडचणी जाणल्या

🔹ना.वडेट्टीवार यांनी लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करून सविस्तर माहिती घेतली

🔸पूरग्रस्तांना भरीव मदत देणार – आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.18ऑक्टोंबर):-गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात जोरदार पाऊस झाला. या पुरामुळे अनेक जण वाहून गेले असून शेतकऱ्याचे उभे पीक उध्वस्त झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज सकाळ पासूनच नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा सुरू केला.

नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी सह अधिकाऱ्याकडून पुराची व झालेल्या नुकसानी बाबतची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली. त्यानंतर थेट तुपा गावातील पूरग्रस्त भागाची थेट जागेवर जाऊन पाहणी केली. शेतकाऱ्यांसोबत थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी श्री. वडेट्टीवार यांनी जाणून घेतल्या.

याप्रसंगी शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यास शासन कटीबद्ध आहे. असे आश्वासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे थेट जागेवर जाऊन करावे, यात कोणीही सुटता काम नये, पंचनामा करतांना वस्तुस्थितीला धरून व पूरग्रस्तांना विश्वासात घेऊन पंचनामे करून शासनाला तातडीने अहवाल सादर करावे जेणेकरून पूरग्रस्तांना तातडीने भरीव मदत देत येईल असे निर्देश त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

नांदेड जिल्ह्यातील पुरामुळे शेतातील पिके पूर्णतः उध्वस्त झाले असून शेतकऱ्याचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्यामुळे त्यांना तातडीने भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी करणारे लेखी निवेदन या भागातीलआमदार अमर राजूरकर, श्री. हंबर्डे, बालाजी कल्याणकर, माजी आमदार डी.पी सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधीनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले.

मंत्री वडेट्टीवार हे आज पासून सलग चार दिवस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत.