संभाजीसेना जिल्हाध्यक्षपदी सुमित उर्फ बंटी जाधव

73

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.18ऑक्टोबर):- संभाजी सेना या सामाजिक संघटनेच्या ग्रामीण बीड जिल्हा अध्यक्षपदी परळी येथील तरुण तडफदार युवक कार्यकर्ते सुमित उर्फ बंटी जाधव यांची निवड करण्यात आली आहे येथील चिंबोरी विश्रामगृहावर संघटनेची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

यावेळी सर्वानुमते संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे ,मराठवाडा अध्यक्ष कृष्णाजी देशमुख यांनी बंटी जाधव यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष बीड पदी निवड केल्याचे पत्र दिले संघटनेचे कार्य निपक्ष पणे वाढवून छत्रपती शिवरायांचे विचार समाजातील शेवटच्या स्थरापर्यंत पोहोंचवण्याबाबत पत्रात नमूद केले असून यावेळी परभणीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके आदी उपस्थित होते.

राज्य कार्यकारिणीने आपणावर दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलून संभाजी सेनेच्या शाखा प्रत्येक गावात करून संभाजीसेनेचा मावळा प्रत्येक घरात निर्माण करून समाजाचे कार्य निश्चितपणे पुढे घेऊन जाण्याचे कार्य आपण करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सुमित उर्फ बंटी जाधव यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

त्यावेळी शुभम जाधव सोमेश वकील मंथन जगतकर मंगेश आकुसकर रोहित ताटे रोहित बारटक्के साईनाथ डोके प्रकाश साळुंके नामदेव मुंडे विशाल आचार्य प्रदीप राठोड रोहित झिंजुर्डे रितेश झाटे ओम बारटक्के स्वप्नील वानखेडे स्वप्नील गिरी दिनेश आमले धनंजय चव्हाण निखिल मुंढे शुभम मोहिते ऋषिकेश रिकिबे शुभम चव्हाण उमेश शिंदे आशिष ढाकणे दिनेश दराडे वैभव रोडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.