महाराजा अग्रसेन यांचा जयंती महोत्सव उत्साहात साजरा

30

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.19ऑक्टोबर):-महाराजा अग्रसेन यांचे 5144 वी जयंती निमित्त अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन (मुंबई), अग्रवाल सेवा समाज, अग्रोहा विकास संस्थानसह इतर सहयोगी संस्थांचे संयुक्त विद्यमाने भव्य ऑनलाईन महोत्सवाचे आयोजन केले होते.

मुंबई अध्यक्ष शिवकांत खेतान, अग्रवाल सेवा समाजाचे अध्यक्ष शीतलकुमार अग्रवाल आणि अग्रोहा विकास संस्थानचे अध्यक्ष विनोदकुमार अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली सम्मेलन महोत्सवाचे दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्धाटन अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनाचे राष्ट्रीय उपमहासचिव डॉ. राजेंद्र अग्रवाल, राष्ट्रीय सचिव सुमन अग्रवाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनूप गुप्ता, लायंस क्लब इंटरनेशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर सीए सुनील पाटोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र रुइया, अजय अग्रवाल या मान्यवरांनी केले.

यावेळी तिरुपति इवेंट्सच्या वतीने ‘सुरीली शाम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले त्यामध्ये प्रशांत नसेरी, सोमाली रॉय, भीम सिंह, रैना लहरी, सर्वेश मिश्रा, सुनीत शाह या गायक कलाकारांनी आपल्या सुमधुर स्वरांने कार्यक्रमाची शान वाढवली.

महोत्सवामध्ये सर्वानी बोलताना समाजातील गरीब गरजूंच्या विकासासाठी आपापले वतीने सर्वानी कायम सहकार्य करून भगवान महाराजा अग्रसेन यांनी समाज विकासासाठी बनवलेल्या आदर्शाप्रमाणे कार्य करण्यास तयारी दाखवली.कोरोनाचे महामारीमुळे ट्यूब, फेसबुक, व्हाट्सऐप या सोशल मीडियाचे माध्यमातूत आयोजित ऑनलाईन कार्यकमामध्ये 40 हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता.