शासकीय कर्मचाऱ्यांकडून माहिती दडपण्याचा प्रयत्न ; पञकारांना धमकीची भाषा

    35

    ?पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष. प्रा. दशरथ रोडे यांचे मार्गदर्शन

    ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
    मो:-8080942185

    बीड(दि.19ऑक्टोबर):- जिल्हातील केज शाखा पुरोगामी पत्रकार संंघ शाखाच्यावतीने दि. 16 अॉक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे विधी-कायदेशीर-सल्लागारांना नियुक्तीपञ या बैठकीत देण्यात आले.संस्थापाक अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशावरुन संपुर्ण महाराष्ट्र कायदेशीर सल्ला देण्यासाठी विधीतज्ञ म्हणून एक विभाग तयार करुन पञकारांवर सतत हल्ले होत असल्यामुळे याची अत्यंत गरज आहे.

    देशात व महाराष्ट्रात शासकीय निमशासकिय,कार्यालयातून वरिष्ट अधिकाऱ्यापासून ते कनिष्ठ व हंगामी नियुक्ती कार्यरत असलेले कर्मचारी तसेच राजकिय नेत्यांच्या कार्यकर्त्यासह नेहमीच बातमी प्रसारित जर नाही केली. त्याबद्दल धमकीलासामोरे जावे लागते. यावेळी शहरातील पोलीस-निरिक्षक व पोलीस-उप-निरीक्षक , तसेच पोलीस कर्मचारांकडून पञकाराला गुन्हा नोंद करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

    शासकिय कर्मचारांकडून शासकीय कोणतेही कामाची चौकशीसाठी पञकार गेले की अयोग्य माहिती मिळते. तसेच पून्हा-पून्हा या कार्यालयातील माहितीसाठी आले तर शासनाच्या वरिष्ट अधिकान्यांकडून व कर्मचारांकडून शासकीय कामात अडथळा यांची राजरोषपणे अन्यथा खंडणीचा गुन्हा दाखल पञकारांना खोटे गुन्हे केली जातात . शासनाच्या कामाची माहिती यांना विचारणार तरी कोण ? राज्यात बांधकाम विभाग , रोजगार हमी योजना, घरकूल योजना , वेग-वेगळ्या कामाची योग्यरित्या मागणी केली तर तो कर्मचारांकडून धमकीचे उत्तर मिळत. . पञकार आहोत तर पञकारांसारखे रहा.

    आम्हीला शासकिय काम केलेली माहिती देता येत नाही. असे त्या शासकिय कर्मचारांकडून नेहमी-नेहमीच अयोग्य उत्तर मिळाल्यामुळेच पञकारांना ” त्या “शासनाकडून गोर-गरिबांना मिळणाऱ्या कामात जर आधिका-यांकडून व कर्मचारांनी कोट्यावधी रुपयांचा राजरोषपणे भ्रष्टाचार करणारे असतील तर त्या कामाची वरिष्ट आधिका-यांपासून ते कनिष्ठ आधिका-यांपर्यत सखोल चौकशी करण्याचा अधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरिता पञकारांना अधिकार आहे.

    यालाच देशाचा व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पञकारांंना ओळखले जाते. आज देशात लोकशाही, संविधान, सामान्य गोर-गरिब धोक्यात आहे. यांना वाचविण्यासाठी समाजातून सर्व-सामान्यांनी एकञ येवून लोकशाहीला व संविधानाला वाचविले पाहिजे. देशाची लोकशाही व संविधानिकता मूल्य जोपासण्याकरिता सर्वांचीच लढा दिला पाहिजे.
    कोणतेही पञकार संघटना असो सर्व राग-लोभ , विसरुन तो पञकार संकटात आहे. त्याला सर्वांचीच एकञ येवून सहकार्य करावी हीच एकजूट पञकारांची असते.

    जेव्हा कोणतीही एकजूट होते.त्यावेळी त्या व्यक्तींना न्याय मिळतो. आज देशात व राज्यात पञकार संघाने विधीतज्ञ किंवा कायदेशीर सल्लागार-पदी कोणत्याही पञकारा संघा’ने विभाग तयार केलेला नाही . राज्यात वेळोवेळी पञकारांवर होत असलेले खंडणीचे आरोप, हल्ले, शासकीय कार्यालयातील वरिष्ट अधिकान्यांकडून कोणत्याही कामाची चौकशी करण्यासाठी गेल्यावर पञकारांना शासकिय कामात अडथळा म्हणून धमकीचे शस्त्र असे आरोप जाणून-बुजून नगर-पालिका महानगरपालिका , तहसिल कार्यालय, इतर शासकीय कार्यालयातून होत असलेले पञकारांना अडथळे हे थांबले पाहिजे.

    त्यामूळे एकमेव पुरोगामी पञकार संघा’च्यातंर्गत महाराष्ट्र राज्य-विधी-कायदेशीर-सल्लागार समितीची स्थापना करावी लागली. पञकारांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी तालूका शाखेने सुध्दा दोन ” विधीतज्ञ ” विधी-कायदेशीर-सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा आधिकार त्या शाखेला देण्यात आला आहे,राज्य विधीतज्ञ माजी न्यायमुर्ती मा. अॕड .बी. जी. कोळसे-पाटील यांची पुरोगामी पञकार संघा’च्यावतीने नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्य सल्लागार माजी न्यायमुर्ती अॕड. अनिल वैद्य व अॕड संध्या राजपूत तर राज्यध्यक्ष अॕड योगेश बोबडे यांनी नियुक्ती केले.

    बीड जिल्हाचे विधी-कायदेशीर-सल्लागार समिती’चे अध्यक्ष.
    अॕड . शेख साजिद अब्दुल वाहेद , केज धारुर परळी गेवराई , बीड, माजलगांव अंबाजोगाई या तालूकामध्ये सुध्दा विधी-कायदेशीर-सल्लागार समिती’ची विधीतज्ञ कार्यरत आहेत . महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालूका विधी-कायदेशीर-सल्लागार-अध्यक्ष ,त्यासोबत कार्याकारणी सुध्दा संघटन करण्याचे आधिकार दिले आहे . संघाचे कार्य व पञकारांंना राज्य-उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा-उपाध्यक्ष, सूर्यकांत उदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य-संघटक .भागवत वैद्य, मराठवाडा सचिव म्हणून स.का.पाटेकर तर विशेष उपस्थिती होते.

    अॕड .सपाटे व शिवाजी दादा ठोंबरे होते.राज्यात निःपक्षपाती व निर्भीड या संघाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.राज्यभरात संघ पदाधिकारी बरोबर इतर क्षेत्रांतील लोकांना संधी देणारा संघ आहे. केज शाखाने संघासाठी विधी-कायदेशीर-सल्लागार केज तालूका अध्यक्ष पदी अॕड ए.एन.नागरगोजे तर सचिव अॕड. सी. एस. हंडीबाग यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपञ सुध्दा देण्यात आले. संघ वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे मत राज्य संघटक भागवत वैद्य यांनी मांडले तर पत्रकारांनी निःपक्षपाती पणे व निर्भीडपणे पत्रकारिता करून सर्व सामान्यांना न्याय मिळावा असे मत त्यांनी मांडले.

    यावेळीं केज तालूका अध्यक्ष राजकुमार धिवार यांनी मत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित घाडगे यांनी तर प्रास्ताविक डी. एम.मुजमुले यांनी केले तर आभार नवनाथ पौळ यांनी मानले. यावेळी अमोल सावंत,विशाल धिरे,अनिल जोगदंड संघाचे पञकार व वरिष्ट पदाधिकारी उपस्थित होते.