५४ वृद्धांना दिला काठीचा आधार

27

🔹उपसरपंच देरकर यांचा आदर्श वाढदिवस

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.19ऑक्टोबर):- समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून जिल्हा स्मार्ट गाव बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.त्यासाठी त्यांनी गावातील ५४ वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरित केल्या.

तसेच गावातील कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ जणांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपसरपंच आशिष देरकर यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला व उतरत्या वयात वृद्धांच्या मनात आनंदाचा क्षण आणला.