मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वस्तीग्रहा चे भूमिपूजन संपन्न

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.19ऑक्टोबर):-महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या मुलींसाठी गंगाखेड येथे जायवाडी परिसर येथे वस्तीगृहाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार रत्नाकरजी गुट्टे काका यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस सुरेश दादा बंडगर जिल्हाध्यक्ष संदीपजी पाटील नगरसेवक तथा गटनेते सत्यपाल साळवे सभापती मुंजाभाऊ मुंडे विधानसभा अध्यक्ष कृष्णा भाऊ सोळंके पूर्ण पालम प्रभारी महादेवराव गायकवाड राधाकिशन शिंदे तालुकाध्यक्ष शिवाजी पवार शहराध्यक्ष इंतेसा सिद्दिकी युवा नेतृत्व प्रताप भाऊ मुंडे नगरसेवक प्रमोद मस्के आकाश मोटे चाऊस राम मुसळे सर्व रासपा लोकप्रतिनिधी व गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.