आमदार अशोक बापू पवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांची केली पाहणी

34

✒️सुनिल ज्ञाननदेव भोसले(विशेष प्रतिनिधी)

पूणे(दि.20ऑक्टोबर):-शिंदवणे,वळती,व उरुळी कांचन या गावांमध्ये अतिवृष्टी ढग फुटी मुळे शेती ,रस्ते,नाले, व बंधाऱ्याचे झालेले नुकसानीचे पाहणी करण्यासाठीआज सोमवार दि.१९/१०/२०२० रोजी सकाळी ११ वाजता शिंदवणे, वळती,व उरुळी कांचन या ठिकाणी शिरूर हवेली चे आमदार अशोक बापू पवार साहेब व जिल्हाधिकारी राजेश देशमुख साहेब,प्रांत अधिकारी सचिन बारवकर साहेब,तहसिलदार सुनील कोळी साहेब,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के साहेब, मंडल अधिकारी दीपक चव्हाण साहेब, पोलीस निरीक्षक सुरज बंडगर साहेब, पंचायत समिती हवेलीच्या मा.सभापती वैशालीताई महाडीक,जि. प.सदस्य कीर्तीताई कांचन,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.

तसेच शिंदवणे गावचे मा.सरपंच आण्णा महाडीक, वळती गावचे मा.सरपंच एल.बी.कुंजीर ऊरुळी कांचन चे मा उपसरपंच भाऊसाहेब कांचन व मा उपसरपंच सागर कांचन अमित कांचन सागर आबा कांचन आर्जुन कांचन राजेंद्र चौधरी संजय चौधरी संतोष कांचन प्रसाद कुंजीर ऊपस्थित होते.

जिल्हा आधिकारी साहेबानी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शेतकऱ्यांचे झालेल्या पिकाचे नुकसानीचे ४ ते ५ दिवसामध्ये पंचनामा करून संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल पाठवून लवकरात लवकर शेतकरी राजाला नुकसान भरपाई द्यावी असे संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी , ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.