नँशनल सोशालिस्ट पार्टी युवा मोर्चा यांच्याकडुन महिला अत्याचाराचाजाहीर निषेध

34

✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बारामती(दि.20ऑक्टोबर):-फलटण तालुक्यातील उपळाई गावात भगिनीची अत्याचार करून हत्या करण्यात आली.ही घटना अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद असून पुरोगामी महाराष्ट्र राज्याला मान खाली घालायला लावणारी आहे.सदर घटनेतील दोषी आरोपींवर अत्यंत कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.

यासाठी समाजातील संघटना आणि संस्थांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून एकत्र येऊन प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची गरज आहे.ही वेळ राजकारण करण्याची नाही.सातारा जिल्ह्यातील स्थानिक संघटना आणि इतर समाज बांधव सदर बाबीचा, पाठपुरावा करत आहेत त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे.

नँशनल सोशालिस्ट पार्टी युवा मोर्चा च्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत, या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच नँशनल पार्टी रस्त्यावर उतरणार आहे, घटना या मुलीसोबत झाली उद्या आजून कोणत्या भगिनी सोबत होऊ नये, म्हणून आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सुशांतभाऊ गोरवे युवा (प्रदेशाध्यक्ष नँशनल सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य) यांनी केले.